शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

राजापूर तालुक्यात भाजपची स्थिती अद्याप शोचनियच

By admin | Updated: November 2, 2014 00:50 IST

कार्यकर्त्यात मरगळ : राज्यातील सत्तांतरानंतर तरी बळकटी मिळण्याची आशा

राजापूर : केंद्रापाठोपाठ राज्यातदेखील सत्तेवर आलेल्या भाजपाची राजापूर तालुक्यातील परिस्थिती अत्यंत शोचनीय असून लाभलेल्या सत्तेच्या माध्यमातून तालुक्यात हा पक्ष बळकटी प्राप्त करील काय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजपाला केंद्रात पूर्ण बहुमतात सत्ता प्राप्त करता आली होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा संपादन करणारा पक्ष ठरला आणि राज्याच्या सत्तेवर आला. केंद्रापाठोपाठ राज्यातदेखील सत्ता मिळाल्याने भाजपाला प्रचंड जोर चढला असला तरी राजापूर तालुक्यात मात्र या पक्षाची अवस्था अत्यंत नाजूक आहे.मागील अनेक वर्षे केवळ राजापूर शहर वगळता उर्वरित तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजपाची कुठेच शाखा नाही की पदाधिकारीदेखील नाही. आजवर फक्त एकदाच भाजपाचा सदस्य देवाचे गोठणे पंचायत समितीमधून निवडून गेला आहे. तो अपवाद वगळता एकही सदस्य पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेवर तालुक्यातून निवडून गेलेला नाही. विद्यमान क्षणीही भाजपाची पाटी कोरी करकरीत आहे.तालुक्यातील सुमारे १०१ ग्रामपंचायतीवर भाजपाचा एकही सदस्य नाही की सरपंचदेखील नाही. केवळ राजापूर शहरातच मात्र भाजपाला नगरसेवक निवडून आणणे शक्य झाले व यापूर्वी काँग्रेस व सेनेच्या साथीने नगराध्यक्ष ते उपनगराध्यक्षपद प्राप्त करता आले आहे. तालुक्यात अत्यंत नगण्य असलेल्या भाजपाला उभारी मिळण्यासाठी केंद्र व राज्यात आलेली सरकारे टॉनिक ठरु शकतील का? हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे यापुढे भाजपाचा राजापूर तालुक्यात पक्षीय विस्तार कितपत होतो त्यावरच या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय यादवराव यांना दहा हजाराच्या आसपास मते मिळाली होती व त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. यामध्ये तालुक्याच्या काही जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात भाजपाला चांगली मते मिळाली होती. त्या जोरावर पुढील कालखंडात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचे मनसुबे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रचले असले तरी त्यांना प्रथम दोन्ही सत्तांचा चांगला उपयोग करत पक्षाचा जनाधार कसा वाढेल, त्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. भाजपाचे कमळ घराघरात पोचविण्याची जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आली आहे.तालुक्यात भाजपांतर्गत दोन गट परस्पर विरोधात कार्यरत असून एका गटाचे नेतृत्व माजी अध्यक्ष महादेव गोठणकर हे तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस अनिल करंगुटकर करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे का होईना दोन्ही गटांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळे जर पक्ष अधिक वाढवायचा असेल तर आपापसातील मतभेद दूर ठेवून दोन्ही गटांना एकत्र यावे लागेल. तरच भाजपाचे कमळ या तालुक्यात फुलेल. अन्यथा ते कोमेजून जाईल अशीच इथली परिस्थिती राहिल. (प्रतिनिधी)