शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

कृषी अर्थशास्त्राच्या आंतराष्ट्रीय परिषदेचा समारोप

By admin | Updated: February 20, 2016 00:45 IST

दापोली तालुका : विविध पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण; हिरोजी उलेमालेंना ‘जीवन गौरव’

दापोली : कृषी विद्यापीठाच्या डॉ. स्वामीनाथन सभागृहात कृषी अर्थशास्त्रविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.व्यासपीठावर विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. रमेश बुरटे, महाराष्ट्र अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे, परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष तथा कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जीवन तलाठी, आयोजन सचिव डॉ. सुधीर वाडकर, डॉ. राजेंद्र देशमुख व डॉ. एस. सी. नागपुरे उपस्थित होते.यावेळी परिषदेतील विविध विषयांवर शोधनिबंध, पोस्टर सादरीकरण करणाऱ्या विजेत्यांना तसेच विविध समित्यांच्या प्रतिनिधींना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रा. हिरोजी उलेमाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार डॉ. शामराव जहाँगीरदार यांना, स्व. प्रा. वेणुताई उलेमाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थ्यांसाठी असलेला पुरस्कार एस. टी. गोरे यांना, स्व. वामनराव महिंंदे्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ परिषदेत सर्वोत्कृष्ट शोधनिबंध सदर करण्यासाठी असलेला चांदीचा चषक डॉ. ए. एस. टिंगरे यांना, स्व. पार्वतीबाई महिंंद्रे स्मृतिप्रित्यर्थ सर्वोत्कृष्ट महिला कृषी अर्थशास्त्र पुरस्कार डॉ. रचना पाटील यांना, डॉ. व्ही. डी. गलगलीकर हा पुरूषवर्गातील सर्वोत्कृष्ट शोधनिबंध सादर करणाऱ्याला दिला जाणारा पुरस्कार डॉ. डी. एस. नावडकर यांना, स्व. डी. के. सोहनी स्मृतिप्रित्यर्थ पुस्तक प्रकाशनासाठीचे चांदीचे पदक डॉ. ए. सी. देवरूखकर यांना, स्व. ज्योती सुरेश मारावार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अन्य शाखेतील महिलांमधून सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी दिला जाणारा पुरस्कार स्वप्ना मोरे यांना, स्व. डॉ. जगन्नाथ रामचंद्र काकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कृषी अर्थशास्त्र शाखेतील महिलांमधून सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी दिला जाणारा डॉ. एस. जे. काकडे पुरस्कार तेजश्री निर्मोल यांना, स्व. वामनराव रामराव जहाँगीरदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कृषी अर्थशास्त्र शाखेतील पुरूषांमधून सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी दिला जाणारा डॉ. एस. डब्ल्यू. जहाँगीरदार पुरस्कार पी. एस. देशमुख यांना, स्व. वेणूताई उलेमाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन २०१५मध्ये शेतकऱ्यांसाठी फायदेशीर लेख लिहिणाऱ्यास असलेले प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह डॉ. डी. डी. यादव यांना. स्व. वेणुताई उलेमाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरूषांमधून सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठीचे रोख पारितोषिक व्ही. ओ. बोंद्रे यांना, तर स्व. राहुल सुरवसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पोस्टर सादरीकरणासाठी असलेले प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह सूरजकुमार राऊत व भरतेश कुपानहट्टे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल डॉ. एस. एस. वाडकर यांना कृतज्ञता प्रमाणपत्र व चांदीचे पदक देऊन डॉ. प्रकाश महिंद्रे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉ. एस. एस. वाडकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नितीन गोखले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जीवन तलाठी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठामध्ये दोन दिवसीय कृषी अर्थशास्त्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध विषयांवर उहापोह झाला.कृषी अर्थशास्त्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. त्यामुळे या परिषदेला अधिक महत्व प्राप्त झाले होते.कृषी अर्थशास्त्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा यावर्षीचा मान दापोली कोकण कृषी विद्यापीठाला मिळाला होता. या परिषदेचे उद्घाटन दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.