शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृषिवनिकी संकल्पना शेतकऱ्यांना तारणार

By admin | Updated: December 5, 2015 00:21 IST

पी. के. नायर : वनसंसाधन, वातावरणातील बदलाबाबत दापोलीत राष्ट्रीय परिसंवाद

दापोली : भारतातील एकंदर भौगोलिक स्थिती, वातावरण हे कृषिवनिकी क्षेत्राला अत्यंत पोषक असल्याने भारतात यापुढे कृषिवनिकीच्या माध्यमातून शेती संकल्पनांची जुनी कवाडे नव्याने उघडणे आवश्यक असल्याचे मत फ्लोरीडा युनिवर्सिटीचे ज्येष्ठ कृषिवनिकी तज्ज्ञ डॉ. पी. के. आर. नायर यांनी दापोलीत व्यक्त केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वनशास्त्र महाविद्यालय आणि कृषी वनस्पतीशास्त्र विभाग आणि भारतीय वृक्षशास्त्रज्ञ संस्था हिमाचल प्रदेश-सोलन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात आयोजित तीन दिवसीय वनसंसाधन आणि वातावरण बदल विषयावर राष्ट्रीय परिसंवादात डॉ. नायर बोलत होते.कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी सांगितले की, शेतकरी व आदिवासी यांनी त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी वने व वनांतील संसाधनांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. तरच ही संपत्ती टिकून राहील. त्यासाठी प्रत्येकानेच वनसंवर्धनाची जबाबदारी उचलली पाहिजे, असे डॉ. भट्टाचार्य म्हणाले. या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात ८ राज्यांतील १२ विद्यापीठांचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. यावेळी शास्त्रज्ञांच्या ५५ शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. परिसंवादात डॉ. के. एस. शर्मा, डॉ. शाम विश्वनाथ, डॉ. अजित ठाकूर, डॉ. रमेश मढव, डॉ. जितेंद्र सिंंग यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. नारखेडे, ए. डी. राणे, व्ही. एम. म्हैस्के, बी. एल. ठवरे, एम. एम. बुरोंडकर यांच्यासह सहकाऱ्यांनी परिसंवाद यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन व्ही. के. पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)दापोलीत आयोजित या राष्ट्रीय परिसंवादात कृषी विषयाशी संबंधित अनेक शोधनिबंध सादर करण्यात आले. या शोधनिबंधांवर त्यानंतर चर्चा करण्यात येऊन खुला परिसंवादही पार पडला.आठ राज्यातील १२ विद्यापीठांचे शास्त्रज्ञ सहभागी.शास्त्रज्ञांच्या ५५ शोधनिबंधांचे सादरीकरण.विविध विषयांवर मार्गदर्शन.