शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
4
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
6
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
7
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
8
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
9
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
10
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
11
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
12
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
13
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
14
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
15
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
16
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
17
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
18
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
19
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
20
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."

नटसम्राटामध्ये कॉमन मॅन, आजही आठवणी ताज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:35 IST

साधी राहणी, सहज अभिनय व नाटकानंतर प्रेक्षकांशीही सहजतेने वागणारे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यामध्ये एक कॉमन मॅन दडला होता, अशी प्रतिक्रिया चिपळुणातील नाट्यरसिकांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनटसम्राटामध्ये कॉमन मॅन, आजही आठवणी ताज्याचिपळुणातील नाट्यरसिकांची भावना

संदीप बांद्रे चिपळूण : साधी राहणी, सहज अभिनय व नाटकानंतर प्रेक्षकांशीही सहजतेने वागणारे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यामध्ये एक कॉमन मॅन दडला होता, अशी प्रतिक्रिया चिपळुणातील नाट्यरसिकांमधून व्यक्त होत आहे.डॉ. श्रीराम लागू यांचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. या घटनेनंतर त्यांच्याविषयी चिपळुणातील नाट्यरसिकांच्या मनातील आठवणींना उजाळा मिळाला. साधारण १९७५पूर्वी चिपळुणात नाट्यगृहांची फारशी सुविधा नसताना डॉ. लागू यांची अनेक नाटके चिपळूणवासियांनी पाहिली.

शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या त्याकाळच्या अभ्यंकर रंगमंचावर त्यांचे अग्निपंख हे नाटक गाजले होते. त्यांच्या भूमिकेतून नटसम्राटही चिपळूणवासियांनी अनुभवला आहे. त्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात कलावंतांच्या मदतीसाठी निधी उभारण्याकरिता मोठमोठ्या कलाकारांना सोबत घेऊन एक कार्यक्रम त्यांनी केला होता. या कार्यक्रमालाही प्रतिसाद दिला होता.नाट्यप्रयोग करताना ते कलाकार म्हणून वेळेला फार महत्त्व देत असत. त्यांचे बहुतांशी प्रयोग सायंकाळी ७ वाजता सुरू व्हायचे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत प्रयोग सुरू झाला पाहिजे, असा त्यांचा नाट्य संयोजकांकडे नेहमी आग्रह असायचा. पाच मिनिटे उशिरा त्यांचा प्रयोग सुरू झाला, असे कधीच घडले नाही. त्यामुळे त्यांच्या या स्वभावाची चिपळुणातील नाट्यरसिक आजही तितकीच आठवण काढतात.नाटक संपल्यानंतर किंवा आधी मोकळ्या वेळेत ते अनेकांशी संवाद साधत असत. त्यामुळे त्यांचा साधा व सरळ स्वभाव एकूणच त्यांच्यातील कॉमन मॅन आजही अनेकांना स्मरतो. डॉ. लागू यांच्या अभिनयातही फारसा उत्स्फूर्तपणा किंवा अतिरेकपणा नव्हता. अगदी सहजपणे त्यांचा अभिनयाचा भाव दिसत असे. त्यांच्या या अनोख्या शैलीतील अभिनयाला चिपळूणकरांनी नेहमीच दाद दिली. 

केवळ सोबतच्या कलाकारांनाच नव्हे तर पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येकाची काळजी डॉ. लागू नेहमी घ्यायचे. शाकाहारी जेवण ते करत असत आणि त्यांना चिपळुणातील जेवण खूप आवडत असे. प्रत्येक कार्यक्रमाला आल्यानंतर ते नेहमी वृंदावन लॉज येथे थांबत असत. एकदा त्यांना अलिबाग येथे सोडण्यासाठी गेलो असताना त्यांनी अलिबागच्या बीचवर फेरफटका मारताना शिंपल्या जमवल्या होत्या. एवढ्या मोठ्या ह्यनटसम्राटाह्णमध्ये असलेला कॉमन मॅन मी त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवला.- श्रीराम कुष्टे, चिपळूण

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूRatnagiriरत्नागिरी