रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांचा तसेच परिसरातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीला नाणारला पाठवू नये, असे निवेदन खासदार विनायक राऊत यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी यांना दिले. या समितीला प्रकल्प परिसरात पाय ठेऊ देणार नाही आणि तरीही समिती आलीच तर पुढे जे होईल त्याला शासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.खासदार राऊत, आमदार व म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, आमदार राजन साळवी यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पाला जनतेने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे कोणाशीही चर्चा करायची त्यांची इच्छा नाही. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती फक्त चर्चा करण्यास येत आहे. ग्रामस्थांना चर्चा नकोच आहे. त्यामुळे समितीला प्रकल्पस्थळी पाठवू नये, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे
समितीला पाय ठेवू देणार नाही - विनायक राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 14:55 IST