शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापुरात उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या उभारणीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

चिपळूण : श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते शहरातील शंकरवाडी येथे पुरात संपूर्णपणे ...

चिपळूण : श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते शहरातील शंकरवाडी येथे पुरात संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला. या पायाभरणी समारंभाला आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे उपस्थित हाेत्या.

महापुरात चिपळूणमध्ये व्यापारी आणि सर्वच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी हे स्वतः चिपळूणवासीयांच्या मदतीसाठी धावून आले व त्यांनी प्रत्यक्ष मदतकार्यासोबतच अन्नधान्याचे वाटप स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र सेवेकऱ्यांनी केले होते. ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती कमवता नाही, अशा लोकांच्या झालेल्या घराच्या पडझडीबाबत स्वामीजींनी या कुटुंबांना छोटेखानी नवीन घरे बांधून देण्याचा संकल्प जाहीर केला. त्यादृष्टीने स्वामीजींनी काही दिवसांपूर्वी आपल्या सेवेकरींसोबत घरांची स्वतः पाहणी केली व घरबांधणीची मोहीम तत्काळ हाती घेतली.

या उपक्रमाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. चिपळूण शहरातील गोवळकोट, पेठमाप, शंकरवाडी, वडार कॉलनी तसेच ग्रामीण भागातील दळवटणे, मुंडे येथील पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली घरे निकषात बसली आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या एकूण १० घरांची उभारणी पहिल्या टप्प्यात होणार आहे. शंकरवाडी येथील सरस्वती शिर्के या गरीब महिलेच्या घरबांधणीचा पायाभरणी शुभारंभ स्वामींजीच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात करण्यात आला.

------------------------

अनेकांचा मदतीचा हात या उपक्रमात आमदार भास्कर जाधव हे घरांच्या उभारणीसाठी लागणारी खडी, जांभा, वाळू उपलब्ध करून देणार आहेत. आमदार शेखर निकम दहा गाडी जांभा चिरा देणार आहेत, तर भगवान कोकरे ट्रॅक्टर, जेसीबी देणार आहेत. नियत फाऊंडेशनचे दत्ता पवार, अमोल कदम, अनुपमा कदम यांच्यावतीने संपूर्ण घरबांधणी कामात लागणारा दगड देण्यात येणार आहे. तसेच निवळी येथील परशुराम सुर्वे, गुलाब सुर्वे हे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर जांभा दगड उपलब्ध करून देणार आहेत. मिलिंद आग्रे, दीपेश आग्रे हे फॅब्रिकेशन काम करून देणार आहेत.

--------------

मदतीसाठी आवाहन वास्तुविशारद दिलीप देसाई यांच्या संकल्पनेतून या घरांची उभारणी होणार आहे. घरे बांधून देण्याच्या सिद्धगिरी मठाच्या या संकल्पात दानशूर व्यक्तींनी आणि लोटे, खेर्डी, खडपोली औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी आर्थिक सहकार्याचा किंवा बांधकामासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची मदत करण्यासाठी गुरुकुल फाऊंडेशनकडे संपर्क करावा, असे आवाहन मठाच्यावतीने श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकारांशी बोलताना केले.