शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

खड्ड्यातून बाहेर येऊन विकासाकडे बघा; उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

By मनोज मुळ्ये | Updated: October 6, 2023 14:29 IST

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.

रत्नागिरी : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संस्कृत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. देशातील पहिली आर्किटेक्चरची फर्म रत्नागिरीत होणार आहे. मुंबईनंतरचे राज्यातील पहिले शासकीय विधी महाविद्यालय येत्या दोन महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. म्हणूनच आता विरोधकांनी खड्ड्यातून बाहेर येऊन या विकासाकडे पाहावे, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हाणला.रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नुकतेच सुरू झाले आहे. येथील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि प्राध्यापकांचा सन्मान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाला.

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत. गुवाहाटी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात प्रथम या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीसाठी हालचाली सुरू झाल्या. तेथेही केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमुळे सर्व परवानग्या अल्पवेळातच मिळाल्या आणि हे महाविद्यालय मार्गी लागले. हे राज्यातील पहिले वातानुकुलीत शासकीय महाविद्यालय ठरले आहे, असे मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

रत्नागिरीमध्ये अनेक विकास कामे होत आहेत. दीर्घकालीन उपयोग होईल, असे शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र विरोधकांना केवळ खड्डेच दिसत आहेत. त्यांनी या खड्ड्यांच्या बाहेर येऊन विचार करावा, असा टोला मंत्री सामंत यांनी हाणला. अर्थात खड्ड्यांवर पर्याय म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून, लवकरच ते काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कौतुकरत्नागिरीत शासकीय महाविद्यालय होण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप मोठे योगदान असल्याचे मंत्री सामंत यांनी आवर्जून सांगितले. केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्यात खूप वेळ जातो. मात्र शिंदे आणि फडणवीस या जोडीमुळे या सर्व प्रक्रिया अल्पकाळात पार पडल्या. त्यामुळेच हे महाविद्यालय सुरू होऊ शकल्याचे ते म्हणाले.

वाघनखे रत्नागिरीत येणारलंडनहून आणलेली वाघनखे तीन वर्षे भारतात राहतील, असा करार आहे. तीन वर्षात ती कोठे कोठे ठेवली जातील, ते निश्चित करण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जगातील पहिले अभ्यासकेंद्र रत्नागिरीमध्ये होणार आहे. तेथे ही वाघनखे काही काळासाठी असावीत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी ती मंजूरही केली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत