शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर पंचायत समितीत अध्ययन निष्पत्ती पुस्तिकांचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 16:19 IST

राजापूर येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अध्ययन निष्पत्ती पुस्तकांचे ढीग जाळून शासकीय निधीची जणू होळीच केली आहे.

ठळक मुद्देराजापूर पंचायत समितीत अध्ययन निष्पत्ती पुस्तिकांचे दहनढीग जाळून शासकीय निधीची जणू होळीच

राजापूर : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अध्ययन निष्पत्ती पुस्तकांचे ढीग जाळून शासकीय निधीची जणू होळीच केली आहे.शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांना, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना अध्ययन निष्पत्ती पुस्तिकांचे वितरण प्रत्येक पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून शासनाने केले होते. मात्र, राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी काहीच देणे घेणे नसल्याप्रमाणे वितरणासाठी आलेल्या या पुस्तिकांचे वाटप न करताच त्या जाळून टाकण्याचा पराक्रम केला आहे.राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार हा वादग्रस्त ठरत आलेला असताना मागच्यास ठेच, पुढचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोणीही शहाणपणा घेताना दिसून येत नाही. शासन स्तरावरुन आलेल्या अध्ययन निष्पत्ती पुस्तिकांचे वाटप न केल्यामुळे त्या तशाच पडून राहिल्या होत्या.

या सर्व अध्ययन पुस्तिका पंचायत समितीच्या मागील बाजूस ढीगच्या ढीग जाळून टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शासन दरबारी याचा हिशेबच मिळणार नाही व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल काहीच देणे-घेणे नसल्याचे यातून पुढे आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी