शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

रत्नागिरी जिल्ह्यात ११३ रास्तदर धान्य दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 7:00 PM

प्रत्येक महसुली गावाला सरकारमान्य एक रास्तदर धान्य दुकान असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बंद १११ दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले होते. नव्या दुकानांसाठी शासनाकडून अनेक लाभदायी निर्णय घेण्यात आले असून, ५ किलोचा सिलिंडर, दुग्धजन्य पदार्थ आदींची विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली असली तरीही दुकानदारांकडून मात्र प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही ११३ दुकाने बंदच आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात ११३ रास्तदर धान्य दुकाने बंददुकानदारांकडून मात्र प्रतिसाद मिळत नाही

रत्नागिरी : प्रत्येक महसुली गावाला सरकारमान्य एक रास्तदर धान्य दुकान असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बंद १११ दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले होते. नव्या दुकानांसाठी शासनाकडून अनेक लाभदायी निर्णय घेण्यात आले असून, ५ किलोचा सिलिंडर, दुग्धजन्य पदार्थ आदींची विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली असली तरीही दुकानदारांकडून मात्र प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही ११३ दुकाने बंदच आहेत.जिल्ह्यात ९४८ दुकाने मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ११३ दुकाने रिक्त असून, सध्या ८३५ दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी १२७ दुकाने महिला बचत गट चालवत असून, ४ दुकाने पुरूष बचत गट चालवत आहेत. दहा दुकाने माजी सैनिक चालवत आहेत, तर २०० दुकाने सहकारी संस्था चालवत आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून या रिक्त दुकानांपैकी काही दुकाने तात्पुरत्या व्यवस्थापनाखाली चालवायला दिलेली आहेत, तर उर्वरित दुकाने लगतच्या दुकानाला जोडलेली आहेत.जिल्ह्यात १५३६ महसुली गावे आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक महसूल गावात रेशन दुकान असणे आवश्यक आहे. त्यासाठी २००७ साली शासनाने महिला बचत गटांना नवीन दुकाने चालविण्यास द्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून नव्या दुकानांसाठी जाहीरनामे वारंवार काढण्यात आले होते. महिला बचत गट पुढे आले नाहीत. त्यामुळे शासनाने निर्णय बदलून समाजातील इतर घटकांना दुकाने चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला.शासनाकडून मिळणारे कमिशनसह इतर लाभ तूटपुंजे असल्याने काहींनी दुकाने बंद करून अन्य व्यवसाय सुरू केले. याचा परिणाम नवीन दुकानांवरही झाला असून, ती चालवण्यासाठी कुणी पुढे येत नाहीत. तसेच सध्या ही रिक्त दुकाने शासनाने तात्पुरत्या व्यवस्थापनावर चालविण्यास दिली असली तरीही या तात्पुरत्या चालविणाऱ्यांना कायमस्वरूपी दुकानांप्रमाणे कोणतेच लाभ मिळत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे ही दुकाने सांभाळणाऱ्या या व्यवस्थापनाला कायमस्वरूपी करण्याची मागणीही रास्त दर धान्य दुकान चालक - मालक जिल्हा संघटनेकडून गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. आधी या दुकानांना कायमस्वरूपी परवाने द्या. मगच नवीन दुकाने सुरू करा, अशी भूमिका या दुकानदारांची आहे.या दुकानदारांच्या आंदोलनाची दखल घेत २०१६मध्ये शासनाने वाहतुकीच्या रिबेट दरात ७३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. पॉस मशिनद्वारे धान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांचे मार्जिन ७० रूपयांवरून १५० रूपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. तसेच या दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तांदूळ, खाद्यतेल, पामतेल, कडधान्य, डाळी, शेंगदाणे, प्रमाणित बी बियाणे आदी वस्तुंबरोबरच आता दुग्धजन्य व भाजीपाला विक्री करण्याची परवानगी दिली आहे. सध्या रिक्त असलेल्या या दुकानांसाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून जानेवारीमध्ये १२१ दुकांनासाठी जाहीरनामे काढण्यात आले होते. त्यावेळी केवळ २१ दुकानांसाठी प्रस्ताव आले होते.धान्याबरोबर इतर वस्तूंची विक्रीरत्नागिरी जिल्ह्यात रास्तदर धान्य दुकानदारांना शासनाने अनेक लाभ देऊ केले आहेत. धान्याबरोबरच इतर वस्तुंची विक्री करण्याची मुभा दिली आहे. पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करणाऱ्यांच्या कमिशनमध्येही भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे महिला बचत गट, सहकारी संस्था किंवा ग्रामपंचायती यांनी लगेचच नवीन दुकानांसाठी पुढे यावे आणि या योजनेचा फायदा करूनघ्यावा.- डॉ. जयकृष्ण फड,जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी७८ लोकांचे अपिलवर्षानुवर्षे तात्पुरत्या व्यवस्थापनावर काम करूनही अजून शासनाने त्यांचे परवाने कायम केलेले नाहीत. अशा ७८ लोकांनी अपिल केले. मात्र, याबाबत अजून काहीच निर्णय नाही. त्यामुळे २६ लोकांनी राजीनामे दिले. आतापर्यंत शासनाच्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. सध्या तर जी दुकाने तात्पुरत्या स्वरूपात वर्षानुवर्षे चालविली जात आहेत, त्यांना परवाने द्या. त्यासाठी जाहीरनामे काढण्याची गरजच काय?- नितीन कांबळे, सचिव, जिल्हारास्तदर धान्य दुकान चालक - मालक संघटना, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार