शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दादर पॅसेंजरमध्ये अस्वच्छतेचा कळस

By admin | Updated: April 19, 2017 13:12 IST

बेसीनमध्येही घाणीचे साम्राज्य, प्रवाशांमधून संताप

आॅनलाईन लोकमतसंगमेश्वर (जि. रत्नागिरी), दि. १९ : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर - रत्नागिरी पॅसेंजरमधील शौचालयाच्या अनेक खिडक्या तुटलेल्या असून, बेसीनमध्येही घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.दादर - रत्नागिरी पॅसेंजर ही नियमित धावणारी गाडी कोकणी प्रवाशांसाठी वरदान ठरलेली आहे. नेहमीच प्रवाशांनी लगडलेली रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी फायदेशीर आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रत्नागिरीहून रात्रीच्या वेळेस मुंबईच्या दिशेने जाणारी आणखी एक पॅसेंजर गाडी सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशी असा तिकीट दर असल्यामुळे वर्षभर ही गाडी हाऊस फुल्ल चालते. साहजिकच याचा फायदा कोकण रेल्वेला होतो.असे असताना सध्या या पॅसेंजरमधील शौचालयाच्या काही खिडक्या तुटल्या असून, अनेक खिडक्या गायब आहेत. काही खिडक्या शौचालयाच्या भांड्यावर आडव्या टाकण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच शौचालयातील काही बेसीन व दरवाजाजवळील बेसीन सध्यस्थितीला अस्वच्छ असलेली पाहावयास मिळत आहेत. ही बेसीन अस्वच्छतेने अक्षरश: माखलेली असल्याने बेसीनमध्ये प्रवाशांना तोंड धुण्याचीही इच्छा होत नाही. बेसीन अस्वच्छ असल्याने या बेसीनजवळ गेल्यास प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर गाडीमधील दोन्ही सीटच्या मधील भागात व सीटवर बसल्यानंतर पाय ठेवण्याच्या भागामध्येही मोठ्या प्रमाणात कचरा व टरफले साठलेली असतात. याचाही त्रास प्रवाशांना होत आहे. या सर्व समस्यांमुळे प्रवाशांमध्ये सध्या कमालीची नाराजी असून, प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे कमी म्हणून की काय या गाडीला क्राँसिंगच्या नावाखाली सतत रखडवत ठेवले जाते, अशी प्रवाशांची तक्रार आहे. ही गाडी कधीही वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे या सगळ्या समस्यांनी प्रवासी मात्र हैराण झाला आहे. या समस्यांकडे कोकण रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या समस्या कायमच्या दूर कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)