शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्राची दुरूस्ती होणार

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

नगर परिषद : आम्ही चिपळूणकरने मानले पालिकेचे आभार

चिपळूण : गेले दशकभर दुरुस्तीविना खितपत पडलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र्रांच्या दुरूस्तीसाठी निविदा प्रक्रियेला सुरूवात केल्याबद्धल आम्ही चिपळूणकरतर्फे नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांची नगर परिषदेत प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त करण्यात आले. केंद्राच्या दुुरुस्तीला गती देऊन लवकरात लवकर काम पूर्णत्त्वास न्यावे तसेच हा दुुरुस्तीचा आराखडा कसा आहे तो दाखवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोकणातील सर्वांत पहिले सुुसज्ज ठरलेले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे चिपळूणमधील कलाकारांची, रसिकांची फार मोठी गैरसोय झाली होती. एकीकडे नवनवे कलावंत आपली कला प्रदर्शित करण्यासाठी झगडत आहेत, राज्यस्तरावर चिपळुणातील अनेक कलाकार आपली छाप पाडत आहेत आणि दुसरीकडे शहरात कलाकारांना सहज उपलब्ध होईल, असे सांस्कृतिक भवन नाही. याची खंत जनतेला सतत जाणवत होती. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून आम्ही चिपळूणकर या नावाने लोक संघटीत होत गेले. नगर परिषदेला प्रत्यक्ष निवेदने देऊन सांस्कृतिक केंद्र्राच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली. यातून जोपर्यंत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र कलाकार, रसिकांच्या सेवेत रूजू होत नाही तोपर्यंत केंद्राच्या पारावर कार्यक्रम करण्याचा विचार पुढे आला आणि दोन कार्यक्रम पार पडले. त्यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. जनतेच्या या आवाहनाची दखल घेऊन नगर परिषदेने आपली कार्यवाही अ गतिशील केली आणिदुरूस्तीची निविदा प्रक्रिया सुरू झाली. आम्ही चिपळूणकरचे अनेक कार्यकर्ते, कलाकार नगर परिषदेजवळ एकत्र आले. या सर्वांनी नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या दालनात त्यांना पुष्पगुच्छ दिला. उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांचेही आभार मानले. यावेळी नियोजन आणि विकास समितीचे सभापती शौकत काद्री, राजन इंदुलकर, निशिकांत पोतदार, राजू जाधव, प्रकाश सरस्वती गणपत, प्रताप गजमल, वेदिका पडवळ, सचिन कांबळे, डॉ. दिलीप ओतारी, तिवरेकर , रुपेश धाडवे, सिद्धेश पाथरे, महेश कापरेकर, जितेश जाधव, रमेश शिंदे, श्रुती नित्सुरे, सुप्रिया लाड, प्रथमेश जाधव, प्रणव कोलथरकर, आकाश कांबळी, रोहित बेर्डे, नितीन सकटे, सागर शिरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)