शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चिपळूण नगरपरिषद : उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

By admin | Updated: September 20, 2014 00:21 IST

व्हिजिलन्स विभागाच्या उपसंचालकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना

चिपळूण : शहरातील नगर परिषदेच्या व्यवस्थापन व आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी याबाबतचा अहवाल दि. ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने कोकण विभागीय व्हिजिलन्स विभागाच्या उपसंचालकांना दिले आहेत, अशी माहिती नगरसेवक अविनाश केळस्कर यांनी आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जनरेटर खरेदी, डिझेल खरेदीच्या नकली पावत्या दाखल करुन आर्थिक गैरव्यवहार, तुरटी व ब्लिचिंग पावडर खरेदीतील आर्थिक गैरव्यवहार, रोड रोलरसाठी डिझेल खरेदीच्या नावाखाली गैरव्यवहार, नळपाणी योजनेचे पाईप खरेदी न करता केवळ बिले दाखविणे अशा गैरव्यवहाराबाबत शहाबुद्दीन गोठे, नगरसेवक सुरेखा खेराडे, नगरसेवक राजेश केळस्कर, नगरसेवक संजय रेडीज, मोहन मिरगल, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे यांनी याबाबतची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. माहितीच्या अधिकाराचा वापर करुन चिपळूण नगर परिषदेतील भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी पुरावे गोळा केले होते. दि. २८ एप्रिल २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयात याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. अ‍ॅड. असिम सरोदे, अ‍ॅड. निखिलेश पोटे यांनी उच्च न्यायालयात खटला चालविला होता. न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे हा खटला चालला. यामध्ये प्रतिवादी म्हणून नगर विकास विभागाचे सचिव, नगर परिषद मुख्याधिकारी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, चिपळूणचे मुख्य लेखपाल, रत्नागिरीच्या लोकनिधी आॅडिट विभागाचे शासकीय आॅडिटर व चिपळूण पोलीस निरीक्षकांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे. संबंधितांना दि. ६ जानेवारी २०१५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरपरिषदेच्या आर्थिक गैरव्यवहाराची जंत्रीच याचिकेतून पुराव्याच्या आधारे मांडण्यात आल्याने उच्च न्यायालयानेही याची दखल घेतली. त्यामुळे गेल्या ७ वर्षाच्या कालावधीत झालेला आर्थिक गैरव्यवहार या याचिकेमुळे पुढे आला आहे. तसेच आरोग्य व बांधकाम विभाग व अन्य विभागांवरसुद्धा माहितीच्या अधिकारातील माहिती सादर करुन याचिका दाखल करण्याचे काम चालू आहे. गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस येणे ही प्रक्रिया यानंतरची प्रशासन व्यवस्था पारदर्शक व प्रामाणिक बनविण्यास मदत ठरेल असे मतही अ‍ॅड. असिम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देताना चिपळूण नगर परिषदेने कोकण विभागीय व्हिजिलन्सला आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि फाईल्स उपलब्ध करुन द्यावी व चौकशीदरम्यान अर्जदार व्यक्तींनाही त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलविण्यात यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे आता निकालाकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. कोकण विभागीय व्हिजिलन्स उपसंचालकांच्या समितीतर्फे चौकशी करण्याचे निर्देश.दि.३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना.जनरेटर, डिझेल, तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबतची याचिका दि.२८ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.