शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण उड्डाणपूल दुर्घटना: ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस; केंद्रीय समितीही पाहणी करणार 

By संदीप बांद्रे | Updated: October 18, 2023 18:28 IST

लवकरच याबाबत सत्य उघड होण्याची शक्यता

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेखनाका येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाचे काम करणारी मूळ ठेकेदार कंपनी तसेच पोट ठेकेदार कंपनी व संबंधित सल्लागार कंपनीला देखील शासनाने करणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात केंद्रीय समिती देखील चिपळूण मध्ये येणार असून पाहणी करणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल दुर्घटनेची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतल्याचे आता समोर येऊ लागले आहे.मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख ते प्रांत कार्यालय असा सुमारे १.८३ किलोमीटर चा उड्डाणपूल उभारला जात आहे.पुलाच्या पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू असतानाच सोमवारी दुपारी पुलाचा काही भाग कोसळला. त्यामुळे साहजिकच कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या. लोकांनी देखील यासंदर्भात जोरदार आवाज उठवल्याने राजकीय व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यकर्ते तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील याबाबत दखल घेतली.आता शासनाने थेट दखल घेतली आहे. या उड्डाणपुलाचा मूळ ठेका एका ठेकेदाराकडे तर पोट ठेका दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आला आहे. आता शासनाने दोघांनाही कोंडीत पकडले आहे. मूळ ठेकेदार तसेच पोट ठेकेदाराला देखील पूल कोसळल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसमध्ये अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले असल्याची देखील माहिती मिळत आहे. कारणे दाखवा नोटीस मिळताच ठेकेदार कंपनीचे धाबेच दणाणले आहेत.राज्य शासनाने दखल घेतल्यानंतर आता केंद्र शासनाने देखील आता गंभीर दखल घेतली आहे. येत्या दोन दिवसात केंद्रीय समिती चिपळूणमध्ये येत असून कोसळलेल्या उड्डाणपुलाची पाहणी ही समिती करणार आहे. पाहणीनंतर समिती आपला अहवाल केंद्राला सादर करेल. त्यानंतर केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून देखील कारवाई होण्याची श्यक्यता आहे. केंद्र आणि राज्य शासनाने देखील आता चिपळूणच्या उड्डाणपुलाची दखल घेतल्याने लवकरच याबाबत सत्य उघड होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण