शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास कोटी थकल्याने चिपळूणचे ठेकेदार संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 14:30 IST

pwd ratnagiri- सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चिपळूण विभागाच्या अख्यतारीत ठेकेदारांची ५० कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने ठेकेदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंते अडचणीत आले आहेत. या बिलांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, अद्याप ठेकेदारांना बिले मिळालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ठेकेदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते कार्यालयात थडकले आणि त्यांनी कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे यांची भेट घेऊन जाब विचारला.

ठळक मुद्देथकीत देयकांसाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंतेही सरसावले अधिकाऱ्यांना विचारला जाब

चिपळूण : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चिपळूण विभागाच्या अख्यतारीत ठेकेदारांची ५० कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने ठेकेदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंते अडचणीत आले आहेत. या बिलांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, अद्याप ठेकेदारांना बिले मिळालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ठेकेदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते कार्यालयात थडकले आणि त्यांनी कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे यांची भेट घेऊन जाब विचारला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यतारीत रस्ते, पूल, साकव यासारखी कामे केली जातात. याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो. मात्र, काही वेळा वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास ठेकेदार अडचणीत येतात. यानुसार गेल्या वर्षापासून ठेकेदारांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांची ५० कोटी रुपयांची बिले सार्वजनिक बांधकाम खात्याकडे थकीत राहिली आहेत.

ही बिले मिळावी यासाठी ठेकेदारासह सुशिक्षित बेरोजगार अभियंते सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, मार्चअखेर आला तरी बिले अजून मिळाले नाहीत. यामुळे ठेकेदारांसमोर आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे बँकांच्या थकीत कर्जासह कामगारांची बिले भागविणे अवघड बनले आहे. यामुळे ठेकेदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंते अडचणीत आले आहेत.या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील ठेकेदारासह सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी कार्यकारी अभियंता मुळे यांची भेट घेऊन जाब विचारला. थकीत बिले येत्या काही दिवसांत मिळाली पाहिजेत, अशी आग्रही मागणी केली. अन्यथा, आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही दिला. यानंतर कार्यकारी अभियंता मुळे यांनी येत्या मार्च अखेरपर्यंत आपली मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.यावेळी चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे सुरेश चिपळूणकर, रत्नागिरी जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष विशाल शेले, जिल्हाध्यक्ष रणजीत डांगे, अभिजीत जाधव, गणेश कांबळे मंगेश माटे आदी उपस्थित होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कामांचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र कामगारांचे पगार द्यावेच लागत आहेत. ही अडचण अनेक ठेकेदारांसमोर असून, वेळेत बिले मिळाण्यासाठी आंदोलनाची तयारीही ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी