दस्तुरी : खेड तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य दिलीप पायरे (६०) यांचे शनिवारी मुंबई येथे रुग्णालयात निधन झाले. दिलीप पायरे हे मुंबई येथे व्यवसायानिमित्त राहत असत. परंतु, यावेळी चिंचघर ग्रामपंचायत निवडणूक असल्याने ते गावी आले होते. माजी आमदार संजय कदम यांचे ते निकटवर्तीय असून, त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली हाेती. ते बहुसंख्य मतांनी विजयीही झाले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतःला प्लंबरचा अनुभव असल्याने वाडी-वस्तीवर जाऊन पाईपलाईनची दुरुस्ती करून घेतली हाेती. दोन महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले हाेते. वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने ते आजारी पडले हाेते. त्यानंतर त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले होते. परंतु शनिवारी त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.
चिंचघर ग्रामपंचायत सदस्य दिलीप पायरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST