शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मुलांची शोधमोहीम तीव

By admin | Updated: February 5, 2016 23:42 IST

जिल्हा परिषदेचा उपक्रम : २२ ठिकाणी घेणार शोध्र

रत्नागिरी : जिल्ह्यातील चिरेखाणी, बांधकाम, क्रशर, झोपडपट्ट्या अशा एकूण २२ ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या मोहिमेचा शुभारंभ केला असून, ती १५ फेबु्रवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे.गरीब, गरजू, रस्ता कामगार, सफाई कामगारांच्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे प्रत्येक मूल शिक्षण प्रवाहात येऊन त्याचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविणे महत्त्वाचे ठरणार आहे. रस्ता कामगारांच्या शाळाबाह्य मुलांच्या प्रवेशावरून रत्नागिरी पंचायत समितीमध्ये जोरदार चर्चा झाली होती. कारण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निवळीतिठाच्या मुख्याध्यापिकेवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे शाळा बंद आंदोलनासह शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, निलंबन रद्द केल्यानंतर त्या मुख्याध्यापिकेला विभागीय चौकशीला सामोरे जावे लागले असल्याने हे प्रकरण पंचायत समितीच्या सभेत जोरात गाजले होते.मागील पंधरावड्यामध्ये जिल्ह्यात ८३ शाळाबाह्य मुलांना शिक्षण विभागाने शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्यानंतर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही शोधमोहीम यशस्वी होण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने संभाव्य २३ ठिकाणांवर सर्व्हेक्षण करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. या मोहिमेमुळे प्रत्येक मूल शाळेत जाणार असून, गरिबांनाही शिक्षण घेता येणार आहे. मोफत शिक्षणातून त्यांचे भवितव्य घडविण्यात मोठी मदत होणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. (शहर वार्ताहर)शिक्षणाच्या प्रवाहात : सर्वेक्षण करावयाची संभाव्य ठिकाणेझोपडपट्टी, चिरेखाणी, इमारत बांधकाम, धरण प्रकल्प, रस्ता चौपदरीकरण, आंबा-काजू बागायती, क्रशर, रेल्वे स्थानक, बसस्थानके, आठवडा बाजार, तालुका व गावाचे मध्यवर्ती ठिकाण, पुलाचे काम, बीएसएनएल केबलची कामे, पाण्याच्या पाईपलाईनची कामे, इतर चालू प्रकल्प, कातभट्ट्या, कोळसा भट्ट्या, हॉटेल्स, घरकाम, दुकाने व संस्था, फिरते विक्रेते आदी ठिकाणी हा शोध घेण्यात येणार आहे. याठिकाणी शिक्षण बाह्य विद्यार्थी सापडल्यास त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.चिरेखाणींसह दुकाने, हॉटेल्सचे सर्वेक्षण होणार.शोधमोहीम १० दिवस राबविणार.शुक्रवारपासून शोधमोहिमेचा शुभारंभ.मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न.