शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
3
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
4
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
5
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
6
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
7
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
8
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
9
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
10
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
11
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
12
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
13
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
14
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
15
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
16
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
17
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
18
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
19
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
20
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

मुख्यमंत्र्यांची थापेबाजीच; शुक्रवारी समाचार घेणार

By admin | Updated: July 22, 2015 01:10 IST

नारायण राणे : विरोधकांनी रोखायला हवी होती चुकीची भाषणबाजी

कुडाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केवळ थापा मारल्या. त्याचा समाचार मी मुंबईत शुक्रवारी घेणार आहे. विरोधक कर्जमाफी मागतात, हे सरकार कर्जमुक्तीची घोषणा करीत आहे. कर्जमाफीला उत्तर नाही. ती देण्याची तयारीही नाही. अनेक पळवाटा घेऊन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत चुकीची भाषणबाजी केली. ही भाषणबाजी विरोधकांनी रोखायला हवी होती. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर या सरकारकडे नाही. सर्व गोष्टी करू म्हणणारे सरकार पाच वर्षे तरी टिकेल काय? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. राणे यांनी कुडाळ येथे मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन शासनावर हल्ला चढविला. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधोगतीकडे नेण्याचे काम या शासनाने केले आहे. या शासनाने कोकणावर अन्याय केला. सी वर्ल्ड प्रकल्पाची सरकारने वाट लावली. शासनाच्या नाकर्तेपणामुळे पर्यटनातून सिंधुदुर्गचा विकास करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार नाही. काँग्रेस या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणण्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहे. सिंधुदुर्गला अधोगतीकडे नेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सी वर्ल्ड प्रकल्प, चिपी येथील विमानतळ, रेडी बंदर या विकास प्रकल्पांना खो घातल्याने हे सरकार सिंधुदुर्गवर अन्याय करीत आहे. मागील शासनाने पर्यटनाच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न पाहिले होते. मात्र, हे स्वप्न आता पूर्ण होणार नाही. कोकणात आंबा प्रकल्प देणार हा विषय हवेतला आहे. ओरोस येथील आय.टी. पार्क, दोडामार्ग येथील एम.आय.डी.सी यासाठी गेल्या आठ महिन्यांत विकासाच्या गोष्टीवर एक पाऊल पुढे सरकलेले नाही. शासनाचा हा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. कृत्रिम पाऊस कुठे पाडणार ते तरी सांगा ? राज्यात पाऊस लांबला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार, असे सांगितले होते. महसूलमंत्री कुठे कुठे पाऊस पाडणार ते त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन राणे यांनी केले. मीडियाची मुस्कटदाबी या शासनकर्त्यांचा सुरू असलेला भ्रष्ट कारभार, खोट्या पदव्या बाहेर काढण्याचे काम विरोधकांनी केले आहे. हा कारभार ऐकायची आणि बघण्याची यांची तयारी नाही. त्यामुळेच मीडियाची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार शासनकर्त्यांकडून होत आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला. शासनाचा नाकर्तेपणा, सी वर्ल्ड प्रकल्प गोत्यात जगातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सी वर्ल्ड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आघाडी शासनाने १०० कोटी रुपये दिले होते; परंतु या सरकारने भूसंपादनाबाबतची परवानगी नाकारली आहे. सी वर्ल्डसाठी जागा संपादित होईल, असा विश्वास आता अधिकाऱ्यांनाही वाटत नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण होणार नाही. मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मुद्दा खोटा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणबाजीतील प्रत्येक मुद्दा खोटा आहे. या भाषणबाजीला शुक्रवारी आपण मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देणार असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)