शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नाणार पुन्हा आणणार मुख्यमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:43 IST

राजापूर : शिवसेनेने युतीसाठी घातलेल्या अटीमुळे भाजपला रद्द कराव्या लागलेल्या रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार येथेच आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र ...

राजापूर : शिवसेनेने युतीसाठी घातलेल्या अटीमुळे भाजपला रद्द कराव्या लागलेल्या रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार येथेच आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राजापुरात दिले. प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांचा उत्साह पाहता नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. आज यावर काहीही भाष्य करता येणार नाही. मला पुन्हा बोलवा, असे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेप्रसंगी राजापूर येथे जाहीर केले.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार प्रकल्पावरूनच शिवसेना-भाजपमधील युती ताणली गेली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान शिवसेनेला इशाराच मानला जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाजनादेश यात्रा राजापुरात आली. महामार्गावर एस. टी. आगारासमोरच त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. आम्हाला प्रकल्प हवा आहे, असा फलक घेतलेले असंख्य समर्थक तेथे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांनी प्रकल्प हवा असल्याच्या घोषणा दिल्या. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘नाणार रिफायनरीसंदर्भात पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. रिफायनरीमुळे कोकणात १ लाख रोजगार उपलब्ध होतील. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असे घसा फोडून सांगत होतो. मात्र आता तुमचा उत्साह पाहून समाधान वाटतं,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा राजापूरात सुमारे दोन तास उशिराने पोहोचली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री विनोद तावडे,आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्याचे स्वागत करण्यासाठी भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत रत्नागिरी जिल्ह्याच्या वेशीवरुन म्हणजेच टाकेवाडी येथून बाईक रॅलीने करण्यात आले. राजापूर एस. टी. आगारासमोर मंडप घालण्यात आला होता, मात्र उशीर झाल्याने मुख्यमंत्र्यानी आपल्या रथावरुनच उपस्थितांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेनिमित्त मी आपले आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आमच्या भाजपा आघाडी सरकारने पाच वर्षात अनेक कामे केली आहेत त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी आलो आहे. तुमचे आशिर्वाद असेच कायम पाठीशी राहुदे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.काय म्हणाले मुख्यमंत्री...‘‘अगोदरपासूनच मी रिफायनरी नाणारला व्हावी म्हणून आग्रही होतो. ही ग्रीन रिफायनरी आहे. यातून कोकणातील तरुणांना एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे मी घसा फोडून सांगत होतो. त्यावेळी झालेला विरोध पाहून आम्हाला रिफायनरी रद्द करावी लागली होती . मात्र आता मी कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी नाणारला रिफायनरी होण्यासाठी चर्चा होऊ शकते. तुमचा हा उत्साह पाहून समाधान वाटते.’’