शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

मुख्य आरोपी महेश नवाथे अटकेत

By admin | Updated: November 15, 2016 23:20 IST

१४ कोटींचे फसवणूक प्रकरण : पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

रत्नागिरी : जागा तसेच फ्लॅटचे आमीष दाखवून ३४० जणांची १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी महेश गोविंद नवाथे याला कल्याण-डोंबिवली येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात आणखी १४ जणांचा समावेश आहे. ही फसवणूक युटोपिया आयडियल सीटी नावाच्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट सीटी प्रकल्पाच्या नावाखाली करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी तालुक्यातील धामणसे-निवेंडी येथे रत्नागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चा संचालक महेश नवाथे याने युटोपिया आयडियल सीटी नावाचा एक अत्याधुनिक प्रकल्प करण्याचे नियोजन केले होते. या कंपनीने आधुनिक पद्धतीने जाहिरात करून ग्राहक मिळविले. प्रत्येक ग्राहकाकडून सुमारे चार ते पाच लाख रुपये आगाऊ पैसे घेण्यात आले. त्याच्या पावत्या देण्यात आल्या. त्याचबरोबर संबंधित ग्राहकांना दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा देता न आल्यास गुंतविलेली रक्कम १५ टक्के व्याजदराने परत करण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते. या प्रकरणात ३४० ग्राहकांकडून सुमारे १४ कोटी २८ लाख २३ हजार ८२० रुपये महेश नवाथे याने घेतले असल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली. ग्राहकांना मुदतीत फ्लॅट न मिळाल्यामुळे ३४० गुंतवणूकदारांपैकी ५७ ग्राहकांनी याची फिर्याद चार महिन्यांपूर्वी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. या ग्राहकांची सुमारे दोन कोटी ७० लाखांची फसवणूक झाली होती. तेव्हापासून आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत होती. याप्रकरणी पोलिसांनी प्रथम निवेदिता नवाथे, शांताराम शिवराम ठाकूरदेसाई, अनिल अजित गांधी व किरण प्रकाश राहटे यांना ताब्यात घेतले होते, परंतु त्यातील मुख्य संशयित आरोपी महेश नवाथे फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध युद्धपातळीवर घेत होते. अखेर मिळालेल्या माहितीचा पाठपुरावा करत पोलिसांनी महेश नवाथे याला कल्याण-डोंबिवली येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी १४ जणांचा समावेश असल्याचीही माहिती प्रणय अशोक यांनी दिली. (वार्ताहर)