शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

थकीत भाडे वसुलीचे आव्हान

By admin | Updated: July 1, 2015 00:30 IST

अलोरे वसाहत : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने निधी बुडाला

संजय सुर्वे - शिरगाव -कोयना प्रकल्पासाठी १९६५ साली अलोरे येथे वसवलेल्या शासकीय वसाहतीमधील निवासस्थाने टप्पा चारच्या कामापर्यंत वापरात होती. मात्र, त्यानंतर प्रकल्पातील अधिकाऱ्यांना भाडेतत्त्वावर दिली. आजअखेर अलोरेतील निवासस्थानांच्या थकीत भाड्याची रक्कम ६२ लाखांपर्यंत पोहोचली आहे.प्रकल्पामुळे भरभराटीस असलेली वसाहत भाड्याने देताना ५०० ते २००० रुपयांपर्यंत रक्कम ठरवण्यात आली. सेवानिवृत्त कर्मचारी, छोटे मोठे ठेकेदार, खासगी व्यावसायिक नोकरदारांच्या मागणीनुसार ११ महिन्यांचा करार करुन निवासस्थाने दिली. प्रतिवर्षी नवीन करार होणे, निवासस्थान दुरुस्ती देखभाल ही जबाबदारी भाडे घेणारा म्हणून शासनाची होती. मात्र, दोन्ही गोष्टींकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. भाडे थकितीबाबत केवळ नोटीस पाठवत राहिल्याने अनेकांची भाडे रक्कम वाढली. आम्हाला कोणत्या दराने भाडे लावले, अशी विचारणा केली जात आहे.अनेक लोक करार न करता पंधरा वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास राहिले आहेत. जुन्या इमारतीची दुर्दशा दाखवत बांधकाम खात्याचे निकष दगडी बांधकामात कसे येतील? असे युक्तिवादाचे धोरण आळवत कार्यकारी अभियंत्यांना नाहक त्रास दिल्याबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे. भाडेकरूंना नोटीस दिल्याने कोणते निकष आहेत, याची विचारणा केली जात आहे. कोयना प्रकल्पासाठी अलोरे वसाहतीत राहणाऱ्यांसाठी असलेल्या वसाहतींचा प्रश्न अधांतरीच असल्याने आता या प्रश्नाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भाड्याची रक्कम ६२ लाख रूपयांपर्यंत असल्याने त्याबाबतीतील प्रश्न तसाच राहिला आहे.