शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

पावणेतीन कोटींचे केटामाईन जप्त

By admin | Updated: May 25, 2014 01:12 IST

चिपळूणमध्ये पाचजणांना अटक : कोट्यधीश व्हायला गेले अन् चतुर्भूज झाले

 चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीतील केटामाईन पावडर चोरून ती विक्री करणार्‍या पाचजणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून पकडले. झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी या तरुणांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. कोकणात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडण्यात आले आहेत. चिपळूण शासकीय विश्रामगृहाजवळ पाच तरुण केटामाईन पावडर घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांना मिळाली. फोर्ड आयकॉन (एमएच १२/डीई ४५२८) या गाडीतून ही पावडर आणली जात असल्याची माहितीही मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री ९.३० वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपाली काळे, निरीक्षक बाजीराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कुदळे, हेडकॉन्स्टेबल महिपती जामदार, सुभाष माने, सुनील पवार, दिनेश आखाडे, संदेश सारंग, जमीर पटेल, वैभव मोरे, रमीझ शेख, मिलिंद चव्हाण, दिनेश कोटकर यांनी पंचांसह वेगवेगळे दोन गट तयार केले. ते विश्रामगृह परिसरात दबा धरून बसले. थोड्या वेळाने तेथे आयकॉन फोर्ड गाडी आली. त्यातून सागर दत्ताराम महाडिक (वय २६, रा. घाणेखुंट), मंगेश सीताराम चाळके (३३), नीलेश अनंत चव्हाण (२६), दीपक दिलीप खेराडे (२९) व त्याचा भाऊ दिनेश दिलीप खेराडे (२८, सर्व रा. पीरलोटे) हे पाच तरुण खाली उतरले. त्यांना पकडून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन किलो ९८० ग्रॅम केटामाईन नावाचा अमली पदार्थ हस्तगत केला. शिवाय आयकॉन गाडी व रोख ८३० रुपये जप्त केले. केटामाईनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत निश्चित नसली तरी ७० लाख रुपये किलो दराने ते विकले जाते. ३ किलो ९८० ग्रॅम केटामाईनची किंमत २ कोटी ७८ लाख ६० हजार रुपये आहे. आयकॉन कार आणि रोख ८३० रुपये असा २ कोटी ८१ लाख ६० हजार ८३० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे करीत आहेत. (प्रतिनिधी)