शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

कोरोनाच्या सावटाखाली होळी सण साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असली, तरी कोरोनाचे सावट मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असली, तरी कोरोनाचे सावट मात्र सर्वत्र आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे रविवार, दि. २८ रोजी मुख्य होळी तोडली जाणार असून सोमवार दि. २९ रोजी सर्वत्र मोठा होम केला जाणार आहे. ग्रामीण पातळीवरही शासनाच्या नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

खेडोपाडी, शहरांत शेवरीचे झाड वाजतगाजत आणून फाकपंचमीला होळी उभी करण्यात आली होती. त्यानंतर १० दिवस पेटविण्यात येते. होळी पौर्णिमेला मात्र मोठा होम केला जाणार आहे. जिल्ह्यात ११६७ सार्वजनिक तर ३०७९ खासगी होळ्या करण्यात आल्या आहेत. शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या रूपे लावून सजविण्यात येतात. काही पालख्या फाकपंचमीनंतर तर काही होळी पौर्णिमेला ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडतात. काही रंगपंचमीनंतर देवळात परततात, तर काही गावांतून चैत्रीपर्यंत पालखी उत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे जिल्ह्यातील १३७७ ग्रामदेवतांच्या पालख्या ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडल्या आहेत.

ग्रामदेवतेच्या दर्शनाला मंदिरात जावे लागते, मात्र शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येते. त्यामुळे भाविक पालखीसाठी गावी आवर्जून येत असतात. मात्र, कोरोनामुळे यावर्षी पालख्या घरोघरी येणार नाहीत. प्रशासनाने निर्बंध घातले असल्यामुळे सहाणेवरच पालखी थांबणार आहे. पालखी नाचविण्यासही मनाई आदेश आहे. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवून पालखीचे दर्शन घेता येणार आहे.

पालखीबरोबर मोजक्याच व्यक्तींची उपस्थिती राहणार असून होळी व रंगपंचमीनिमित्त रंग खेळण्यासही मनाई करण्यात आली आहे. कोरोना रुग्णवाढ सुरू असल्याने सण साजरा करण्यासाठी शासनाने नियमावली जारी केली आहे, जेणेकरून गर्दी होऊ नये किंवा संसर्ग बळावू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांनी शासनाच्या नियमावलींचे पालन करून शिमगोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे.

श्री भैरीचा शिमगोत्सव

बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव रविवार, दि. २८ पासून सुरू होत आहे. कोरोनामुळे पालखीची ग्रामप्रदक्षिणा रथातून होणार आहे. पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होणार नाही. सोमवारी रात्री धूळवड होणार असून दि.२ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता पालखी श्री भैरी मंदिरात परतणार असून धुपारती व गा-हाणे होऊन शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

जिल्ह्यात उभ्या करण्यात आलेल्या खासगी व सार्वजनिक होळ्यांची तसेच पालख्यांची संख्या पुढीलप्रमाणे :

पोलीस स्थानक सार्वजनिक खासगी पालखी

शहर १५ १०७ १५

ग्रामीण ७२ १३० ६८

गुहागर ४६ २३० ४६

जयगड ४५ १६६ २०

पूर्णगड ३० ६५ ५५

राजापूर १०४ १४२ ६१

नाटे १२ ४२ २३

लांजा ९६ ११४ ९८

देवरूख १२० ११२ ७९

संगमेश्वर ७९ १६८ ७९

चिपळूण ९५ १७० ७२

सावर्डे ४३ २५० ४०

अलोरे ३१ ३४५ ३१

खेड २२० ३६० ५७१

दापोली १५० ३७५ --

दाभोळ २४ ५७ १८

मंडणगड ७५ १६५ ५५

बाणकोट ३० ७३ १८

एकूण ११६७ ३०७९ १३७७