शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

शृंगारतळी बाजारपेठेवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: August 31, 2015 21:29 IST

शांतता समिती बैठक : ईद-गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन

शृंगारतळी : शृृंगारतळी येथील बाजारपेठेत सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. पाटपन्हाळे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित शांतता कमिटी बैठकीत ही माहिती देण्यात आली.यावेळी बोलताना विभागीय पोलीस अधीक्षक महादेव गावडे यांनी सांगितले की, आगामी गणेशोत्सव व बकरी ईद शांततेत पार पडतील, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याबरोबर दोन्ही उत्सवाच्या काळात पोलिसांची करडी नजर असणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बी, डीजेवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे कुठलेही अनुचित प्रकार होणार नाहीत, याची दक्षता नागरिकांनी बाळगावी.यावेळी पोलीस निरीक्षक विनित चौधरी, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सरपंच सविता भेकरे, उपसरपंच संजय पवार, सुशील वेल्हाळ, साबीर साल्हे, महेश कोळवणकर, दिनेश चव्हाण, अनंत चव्हाण, गुलाम तांडेल, सत्यप्रकाश चव्हाण उपस्थित होते. या बैठकीवेळी बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने फुकट जनावरे देण्याची योजना आखली आहे. यासाठी काही गावातील लोक मोकाट जनावरे उचलण्याची तयारी करत आहेत. तसेच गुहागर तालुक्याच्या बाहेर जाणाऱ्या जनावरांना पोलीस अडवणार नाहीत. मात्र, त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचे पत्र असणे आवश्यक आहे. मोकाट जनावरे उचलताना मालकांकडून विरोध झाला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जनावर मालकांकडे आपली जनावरे बाजारपेठेतून घेऊन जाण्यास केवळ दोन दिवस उरले आहेत. बाजारपेठेत सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.़ गणेशोत्सव काळात वडापचालकांनी शिस्त बाळगावी अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी खासगी बस वाहतूक प्रकरणावरून तापलेले वातावरण पाहता आगामी काळात पोलीस प्रशासनाला खासगी बसधारकांचा प्रश्न हाताळावा लागणार आहे. या अनुषंगाने सोमवारी पुन्हा खासगी बसमालक चालक व ग्रामस्थाची बैठक लावण्यात येणार आहे. (वार्ताहर)गुहागर तालुक्याबाहेरील खासगी आराम बस मालक व चालकांची मुजोरी वाढत चालली आहे. रात्रीच्यावेळी या गाड्यांमुळे वाहतुक कोंडी होत आहे. यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा वेळप्रसंगी उपोषणाला बसण्याची माझी तयारी आहे़-अनंत चव्हाण, पाटपन्हाळे सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. गणेशोत्सव काळात खासगी गाड्यांमुळे नागरिकांची सोय होत असेल तर त्यात वावगे काही नाही. फक्त शिस्तीने व्यवसाय करावा.-सुशील वेल्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, शृंगारतळी