शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील लाकूड वाहतुकीवर सीसीटिव्ही कॅमेऱ्याची नजर, कुंभार्ली घाटात बसवले कॅमेरे

By संदीप बांद्रे | Updated: October 11, 2023 18:29 IST

काही व्यापारी विना परवाना लाकडाची वाहतूक करतात

चिपळूण : तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते. सातत्याने विनापरवाना लाकूडतोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. विनापरवाना लाकडाची परजिल्ह्यात वाहतूक केली जाते. या पार्श्वभुमीवर तपासणी नाक्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात होती. अखेर वनविभागाने त्याची दखल घेतली आहे. पहिल्या टप्प्यात कुंभार्ली घाटातून पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या लाकूड वाहतूकीवर नजर ठेवण्यासाठी पोफळी तपासणी नाक्यात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.  जागतिक तापमान वाढीचे परिणाम जाणवत असतानाच राजरोसपणे अनेक ठिकाणी बेकायदा जंगलतोड केली जाते. अनेकदा पर्यावरण प्रेमींकडून याबाबतची माहिती दिल्यानंतर वनविभागाकडून संबंधीतावर कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवैध लाकूड वाहतूक रोखण्यासाठी तपासणी नाक्यांमध्ये सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी येथील ग्लोबल चिपळूण टुरीझमच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय वन अधिकारी दिपक खाडे यांच्याकडे केली होती. त्यानुसार खाडे यांनी १५ दिवसात कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिले होते. पोफळी, साखरपा आणि भरणे नाका येथे वनविभागाचे तपासणी नाके आहेत. या तिन्ही नाक्यातूनच परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. काही व्यापारी विना परवाना लाकडाची वाहतूक करतात. केवळ चिपळूण तालुक्यातून दररोज किमान १५ ते २० ट्रकची वाहतूक होते. त्यामुळे तिन्ही तपासणी नाक्यात सिसिटिव्ही बसविण्याचे नियोजन वनविभागाकडून करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात पोफळी येथील तपासणी नाक्यात सिसिटिव्हीची यंत्रणा उभारली आहे. पुढील काही दिवसात साखरपा आणि भरणेनाका येथील नाक्यांमध्ये सिसिटिव्हीची यंत्रणा बसविण्यात येणार आहे. कुंभार्ली घाटातून सातारा जिल्ह्यात बेकायदा होणाऱ्या लाकूड वाहतूकीवर आता सिसिटीव्हीची नजर असणार आहे. 

रत्नागिरी वन विभागांतर्गत जिल्ह्यांच्या सिमाभागात वनउपज तपासणी नाक्यांची स्थापना करण्यात आली आहे.  तपासणी नाक्यांवरील सिसिटीव्हीमुळे अवैद्य वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण करता येईल. भरणेनाका आणि साखरपा येथील तपासणी नाक्यांमध्येही ही यंत्रणा बसवली जाणार आहे. - दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभागcctvसीसीटीव्ही