काॅजवे धोकादायक
दापोली : तालुक्यातील साखळोली गावतळे मार्गावरील साखळोली नदीवरील काॅजवेच्या लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत. या काॅजवेचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून केले आहे. मात्र, त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
‘अमृत’चे मखर
देवरूख : देवरूख न्यू इंग्लिश स्कूलसमोर गुरूकुल नगरमध्ये शिक्षक सुनील करंबेळे यांच्या घरगुती गणेशोत्सवानिमित्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मखर तयार केले आहे. उत्सवातून समाजप्रबोधन व जनजागृतीचा उद्देश असल्याचे करंबेळे यांनी सांगितले.
रिक्त पदांमुळे गैरसोय
राजापूर : तालुक्यातील कृषी विभागांतर्गत कृषी सहाय्यकांची ३७ पदे मंजूर असताना, १४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे २३ कृषी सहाय्यकांवर २३७ गावांचा कारभार सुपुर्द करण्यात आला आहे. परिणामी शासनाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समस्या निर्माण होत असून, शेतकऱ्यांची मात्र यामुळे गैरसोय होत आहे.