शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरूनही सदनिका न देणाऱ्या बिल्डरवर गुन्हा

By admin | Updated: February 27, 2017 23:22 IST

ठार मारण्याची धमकी; चिपळूणमध्ये महिलेची फिर्याद

रत्नागिरी : पूर्ण पैसे भरूनही फ्लॅटचा ताबा देण्यास नकार दिल्याबद्दल चिपळूणमधील बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्राबाबत रत्नागिरीमध्ये काही गुन्हे दाखल झालेले असताना आता चिपळूणमध्येही असा प्रकार पुढे आला आहे. चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील राजश्री राजन पावसकर यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. सदनिकेचा ताबा न देता १८ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा बिल्डर शरद पर्वतराम कदम (चिपळूण) यांच्या विरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.चिपळूण तालुक्यातील मौज खांदाट, नवीन कोळकेवाडी येथे इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले असतानाही सदनिकेचा ताबा दिला जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शरद पर्वतराम कदम यांनी खांदाट येथे निसर्ग गृहप्रकल्प उभारला आहे. या इमारतीमध्येराजश्री पावसकर यांनी २ व ३ क्रमांकाच्या सदनिका सुमारे १८ लाख ८० हजार रुपये किमतीला खरेदीखत करून खरेदी केली होती. त्याचे पैसे त्यांनी वेळेत पोहोच केले होते. तरी या इमारतीतील मालकीच्या सदनिकेचा ताबा देण्यास शरद कदम नकार देत होते. त्यामुळे पावसकर २६ फेब्रुवारीला शरद कदम यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेल्या. कदम यांनी सदनिकेचा ताबा देण्यास नकार दिला. त्याचबरोबर ठार मारण्याची धमकी दिली, असे पावसकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.आपली फसवणूक झाली असल्याचे राजश्री पावसकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ चिपळूण पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शरद कदम यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ५०९, ५०६ तर ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट १९६३ चे कलम ३/१३ (१) कलम ५/१३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शेळके हे करीत आहेत. (वार्ताहर)