शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

बीएसएनएलकडून ‘महाकृषी’ ग्राहकांना ‘अमर्याद’ भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:00 IST

गतवर्षी भारतीय दूरसंचार निगमने (बीएसएनएल) ‘महाकृषी’ ग्राहकांना नाराज केले असले तरी आता अमर्याद संभाषणासह १.५ जीबीचा डेटा प्रतिदिन अशी आकर्षक योजना जाहीर करून देऊन खुश

रत्नागिरी : गतवर्षी भारतीय दूरसंचार निगमने (बीएसएनएल) ‘महाकृषी’ ग्राहकांना नाराज केले असले तरी आता अमर्याद संभाषणासह १.५ जीबीचा डेटा प्रतिदिन अशी आकर्षक योजना जाहीर करून देऊन खुश केले आहे.

‘बीएसएनएल’कडून कृषी कार्डधारकांच्या ‘महाकृषी’ या योजनेत सातत्याने बदल होत आहेत. गेल्या वर्षी बीएसएनएलने महाकृषी योजनेत बदल करून ३० दिवसांच्या वैधतेसह १४१ रूपयांमध्ये १ जीबी डेटा प्रति दिन, १ हजार मिनीटांचे संभाषण मोफत आणि १०० एसएमएस अशी योजना  जाहीर केली होती. तसेच ७७६ रूपयांमध्ये अर्ध वार्षिक (टङर776) व १५५१ रूपयांमध्ये वार्षिक (टङर1551) असा बदल केला होता. 

मात्र, मोफत मिनीटांच्या संभाषणात घट केल्याने ‘कृषी’च्या धारकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, इतर खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी बीएसएनएलनेही कंबर कसली असल्याने महाकृषी योजनेत विशेष बदल केला आहे.  

महाकृषी योजनेत केलेल्या बदलानुसार आता या योजनेत ३० दिवसांच्या वैधतेसह १४१ रूपयांमध्ये १.५ जीबी प्रति दिन डेटा, अमर्यादित संभाषण आणि २०० एसएमएस करता येणार आहेत. तसेच ७७६ रूपयांमध्ये अर्ध वार्षिक (टङर776) व १५५१ रूपयांमध्ये वार्षिक (टङर1551) ही योजना तशीच ठेवण्यात आली आहे

नव्या महाकृषी योजनेत १४१ रूपयांमध्येच आता अमर्याद संभाषणासह १.५ जीबी प्रति दिन डेटा आणि २०० एसएमएस मिळणार आहे. तसेच अर्धवार्षिक व वार्षिक योजनाही मिळणार आहे. त्यामुळे महाकृषीचे ग्राहक बीएसएनएलच्या या नव्या योजनेचे स्वागत करतील, हे निश्चित.

 

टॅग्स :MobileमोबाइलMONEYपैसा