शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी काळबादेवीत उभारणार पूल

By मनोज मुळ्ये | Updated: June 17, 2023 13:26 IST

काेकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती

रत्नागिरी : काेकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गावरील काळबादेवी (ता. रत्नागिरी) येथे पूल उभारण्यात येणार असून, त्यासाठी माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. भू-तांत्रिक तपासणीसाठी बोअरवेल पाडण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. याला एमएसआरडीसीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उभारण्यात येत असलेल्या सागरी मार्गावरील सुमारे १६५ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. उर्वरित रस्ता दुपदरी असेल. या परिसरातील शहरांच्या ठिकाणी बाह्य वळणे घेण्यात येणार आहेत. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी खाडीवर नव्याने पूल उभारले जाणार आहेत. त्यात रत्नागिरीतील काळबादेवी खाडीचा समावेश आहे. काळबादेवी ते मिऱ्या या सुमारे ६०० मीटरहून अधिक अंतर असलेल्या खाडीवरील पूल उभारण्यासाठी माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.एमएसआरडीसीच्या पत्रानुसार, स्टाफ कन्सल्टंटची नेमणूक करण्यात आली असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामध्ये भू-तांत्रिक आणि मृदा अन्वेषण केले जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतर पुलाचे पिलर उभारण्यासाठी भू-संरचना कशी आहे हे निश्चित होईल.दरम्यान, रत्नागिरी ते गणपतीपुळे या मार्गावर शिरगाव आणि परिसरातील रस्ता अरुंद असल्यामुळे काळबादेवी खाडीवर पूल उभारून किनारी भागातून रस्ता बनवण्याबाबत काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु, याला काही कोटींचा खर्च अपेक्षित असल्यामुळे तो मागे पडला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग