शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मिरकरवाडा टप्पा दोनला लागणार ब्रेक

By admin | Updated: October 31, 2014 00:30 IST

अनधिकृ त झोपड्यांचा प्रश्न : जीवन प्राधिकरणाच्या जागेला पुन्हा झोपड्यांचा विळखा

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याला पुन्हा अनधिकृत झोपड्यांमुळे ब्रेक लागणार आहे. जीवन प्राधिकरणाच्या जागेला पुन्हा एकदा अनधिकृ त झोपड्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे दुसरा टप्पा रखडण्याची शक्यता असल्याने प्राधिकरणाने पंधरा दिवसात ही जागा खाली करण्याची नोटीस मच्छिमारांना दिली आहे. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही.मिरकरवाडा बंदराच्या अकरा हेक्टर जागेवर ७४ कोटी रुपये खर्चून हे बंदर विकसीत केले जाणार आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज या संस्थेने तयार केलेल्या सुधारित अहवालानुसार टप्पा क्र. २चे काम हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी ३०० ट्रॉलर्स व २०० पर्ससीन नौका अशा एकूण ५०० नौका उभ्या राहतील, असे सुसज्ज बंदर येथे उभारण्यात येणार आहे. हे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून, शासनाने पहिल्या टप्प्याकरिता निधीदेखील मंजूर केला आहे. याकरिता बंदराची जागा मोकळी करुन मत्स्य खात्याच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. गतवर्षी मिरकरवाडा बंदरातील अनधिकृ त झोपड्या आणि बांधकामे हटविण्यासाठी प्रशासनाकडून १ जून २०१३ ची मुदत देण्यात आली होती. त्यावेळी असलेल्या १७५ अनधिकृत झोपड्या व बांधकामांपैकी जवळपास ७० टक्के बांधकाम मच्छिमारांनीच हटविले होते. उर्वरित बांधकाम जिल्हा प्रशासनाने हटविले. मात्र, वर्षभरानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी झोपड्यांचा विळखा बसला आहे.विशेष म्हणजे २००८ पासून या अनधिकृ त झोपट्या हटविण्याचे काम सुरु होते. तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांच्या मदतीने २५० झोपड्या त्यावेळी हटविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर बंदर विकासाला चालना मिळालेली नाही. पुन्हा एकदा झोपड्यांचे प्रस्थ उभे राहिले.तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याहस्ते मिरकरवाडा बंदराच्या टप्पा दोनमधील विस्तारित कामांचा शुभारंभ करण्यात आला होता. ज्या ठिकाणी मच्छिमारांना सुविधा देण्यात येणार आहेत, त्याचठिकाणी आताच्या घडीला अडीचशे झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. प्राधिकरणाने याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. तरीही या झोपड्या हटविण्यात आलेल्या नाहीत.अनधिकृत झोपड्यांची संख्या वाढल्याने मिरकरवाडा बंदराच्या विकासाला खीळ बसणार आहे. याठिकाणच्या झोपड्या हटविणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. त्यामुळे आता या वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्नाबाबत जीवन प्राधीकरण कोणती भूमिका घेते, याकडे मिरकरवाडा परिसरातील मच्छिमारांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)एकवीस कामे प्रस्तावितआऊटफिटिंग, नौका दुरुस्ती, लिलावगृह, मच्छिमारांना विश्रांतीसाठी शेड, जाळी विणण्यासाठी शेड, लाटरोधक भिंतीचे काम, अंतर्गत रस्ते, नौका दुरुस्ती सुविधा, रेडिओ संपर्क केंद्र, उपाहारगृह, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सुरक्षारक्षक चौकी आदी विविध २१ कामे या दुसऱ्या टप्प्यांतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत.