शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

देवरूखात आढळले नीलपर्ण जातीचे फुलपाखरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 13:23 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी घराजवळ खास फुलपाखरांसाठी तयार केलेल्या खास उद्यानात नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. याचं शास्त्रीय नाव सह्याद्री ब्लू ऑकलिफ असे आहे.

ठळक मुद्दे प्रतीक मोरे यांच्या घराजवळ उद्यान वाळलेल्या पानासारखे दिसणारे फुलपाखरू

रत्नागिरी : जिल्ह्यातील देवरूख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी घराजवळ खास फुलपाखरांसाठी तयार केलेल्या खास उद्यानात नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. याचं शास्त्रीय नाव सह्याद्री ब्लू ऑकलिफ असे आहे.प्रतीक मोरे यांना बागेत फेरफटका मारत असताना माडाच्या झाडा शेजारी हे फुलपाखरू दिसले. माडाच्या बुंध्याला लागलेले हे पान हालचाल करत असल्याचे त्यांनी पाहिले. असं वेगळं पान कसं काय असेल ? अशा कुतूहलाने जवळ जाऊन त्यांनी पाहिलं, तर त्यांना हे फुलपाखरू दिसले. पंख मिटलेले असताना एखाद्या वाळलेल्या पानासारखे ते दिसत होते. पण वारा आल्यानंतर त्याच वाऱ्याबरोबर होणारी हालचाल सुद्धा पानासारखीच होती. इतकी हुबेहूब की एखाद्या भक्षकाला ते पानच वाटावं.ह्यनिंफलिडह्ण म्हणजेच ब्रश फुटेड या कुळात मोडणारे हे फुलपाखरू मुंबईपासून दक्षिण दिशेच्या पश्चिम घाटात प्रामुख्याने आढळून येते. याचे पावसाळी आणि उन्हाळी असे दोन प्रकारचे फॉर्म्स दिसून येतात. जसा आजूबाजूचा परिसर आपलं रुपड बदलतो, तसे हे फुलपाखरू देखील आपली रंगसंगती निसर्गाशी मिळतीजुळती होईल अशा पद्धतीने बदलते. याला शास्त्रीय भाषेत ह्यमिमिक्रीह्ण असे म्हणतात. मुख्यत: भक्षकांच्या नजरेस पडू नये आणि केमॉफ्लाज मिळवता यावा यासाठी अशा प्रकारचे बदल सजीव आपल्या शरीरात घडवून आणतात असे मोरे यांनी सांगितले.या फुलपाखराची मादी कारवी जातीच्या झाडांवर अंडी देते आणि म्हणूनच घाट, सह्याद्रीचे डोंगर, कडे, दाट झाडीची जंगलं अशा ठिकाणी ही वनस्पती पर्यायाने हे फुलपाखरू सुद्धा प्रामुख्याने दिसून येतं. अशी विविधतेने नटलेली आपली सह्याद्रीची जंगलं किती वैशिष्ट्य पूर्ण आहेत त्याचा हा अजून एक ढळढळीत पुरावा असल्याचे प्रतीक मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवBio Diversity dayजैव विविधता दिवसRatnagiriरत्नागिरी