रत्नागिरी : गणेशोत्सवाचे औचित्य साधून येथील छावा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला दात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नारशिंगे येथे हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. एस. गावंडे, जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत, जयश्री कुंडलकर, डॉ. श्रद्धा मॅथ्यू, कृष्णा मकवाना, संदीप वाडेकर तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल किशाेर जोशी, ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विश्राम पानगले, सुहानी कुळ्ये (सरपंच), महेश देसाई (उपसरपंच), अंजली आग्रे (सदस्या), अनंत कुळ्ये (तलाठी), प्रवीण कांबळे (पोलीसपाटील), डॉ. वर्षा वाणी, डॉ. शिवानंद वाणी, शांताराम पानगले, प्रकाश रोडे, अनंत धावडे, प्रकाश धावडे, अमोल कांबळे, विलास मालप, हिंदू राष्ट्र सेनेचे सदस्य प्रवीण रोडे, प्रथमेश कांबळे, विशाल कांबळे, विलास कांबळे आदी उपस्थित होते.
छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील धावडे, उपाध्यक्ष सुनील आग्रे, समीर धावडे, समीर गोताड, संतोष आग्रे, गणेश कांबळे, संगम धावडे, नंदकुमार धावडे, मोहन पवार, प्रवीण धावडे, चंद्रकांत गोताड यांनी स्वागत केले. यावेळी छावा प्रतिष्ठानचे सदस्य रितेश धावडे, राहुल धावडे, सचिन धावडे, विजय धावडे, सुदीप पवार, नीलेश कळंबटे, अमित रोडे, प्रशांत कांबळे, सूर्यकांत गोताड उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली.
बोंडये व आगवे गावातील तरुणांचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. कोरोना काळात छावा प्रतिष्ठानकडून आयोजित केलेले हे ६वे रक्तदान शिबिर होते. याबद्दल जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीकडून धन्यवाद देण्यात आले.