शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: लोटेतील पुष्कर कंपनीत स्फोट, तीन कामगार जखमी

By अरुण आडिवरेकर | Updated: July 18, 2024 18:33 IST

आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे परशुराम औद्याेगिक वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल अँड फर्टिलायजर्स कंपनीत स्फाेट हाेऊन आग लागल्याची घटना ...

आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे परशुराम औद्याेगिक वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल अँड फर्टिलायजर्स कंपनीत स्फाेट हाेऊन आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. उत्पादन प्रक्रियेत लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली. आगीच्या घटनेनंतर जीव वाचविण्यासाठी धावत निघालेले तीन कामगार घसरुन पडल्याने जखमी झाले आहेत.लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील पुष्कर केमिकल कंपनीच्या युनिट नं. १ मध्ये गुरुवारी सकाळी उत्पादन प्रक्रियेचे काम सुरु हाेते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या इथेनाॅल ऑक्साईड या कच्च्या मालाची पाइपलाइनद्वारे वाहतूक सुरु होती. पाइपलाइनमध्ये बिघाड झाल्याने इथेनॉल ऑक्साईड साठवण केल्या जाणाऱ्या ठिकाणी स्फाेट झाला. या स्फाेटानंतर या वायूचा हवेशी संपर्क येताच आगीचा भडका उडाला.या घटनेची माहिती औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पाेहाेचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. जवळपास दीड तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. हा अपघात ज्या ठिकाणी झाला तिथे तीन कामगार काम करत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, ते घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाली.यापैकी संदीप मैती (वय ४०) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर घरडा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर घटनास्थळावर खेडचे पोलिस व महसूलचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. या घटनेचा अधिक तपास खेड पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBlastस्फोटfireआग