शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: खेड तालुक्यात ब्लॅक पँथरचा वावर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 12:56 IST

खेड (जि. रत्नागिरी ) : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या चाकाळे येथील एका शेतघराच्या अंगणात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही ...

खेड (जि. रत्नागिरी) : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या चाकाळे येथील एका शेतघराच्या अंगणात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ब्लॅक पँथर कैद झाला आहे.खेडमधील शीतल पेठे यांच्या चाकाळे येथील शेतघराच्या अंगणात आलेला ब्लॅक पँथर सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. अंगणात एका कुत्र्याला त्याची चाहूल लागल्याने तो जोरजोरात ओरडत असल्याचेही टिपले गेले आहे. या व्हिडीओने मात्र खेड तालुक्यात ब्लॅक पँथर अस्तित्वात असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. नष्ट झालेली प्रजात पुन्हा उभारी घेत असल्याचेही यातून पुढे येत आहे.हा बिबट्या अर्थातच ब्लॅक पँथर बुधवारी (दि. ११) रात्री ९:३६च्या सुमारास कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो भक्ष्याच्या शोधात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हाही बिबट्याचबिबट्याच्या कातडीचा रंग त्वचेतील ‘मेलनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास, कातडी काळी किंवा गडद रंगाची होते. काळ्या बिबट्याच्या बाबतीत हेच होते. त्याच्या शरीरावर नेहमीच्या बिबट्याप्रमाणे काळे ठिपके असतात; पण गडद रंगामुळे ते अगदी जवळ गेल्याशिवाय दिसू शकत नाहीत.

काळा बिबट्या आढळणे, ही बाब तशी दिलासा देणारी आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांतील जंगलांमध्ये या बिबट्याचे अस्तित्व आहे. मात्र, खेडच्या दृष्टीने ही बाब अतिशय दिलासा देणारी आहे. हा बिबट्या वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. -सुरेश उपरे, वनाधिकारी, खेड

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग