शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रत्नागिरीत सेनेचा भाजपला दणका

By admin | Updated: December 26, 2014 23:48 IST

स्थायी समितीवरही बाजी : सर्व समित्यांवर शिवसेना-शहर विकास आघाडीचे वर्चस्व

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत अखेर शिवसेना-शहरविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला. शिवसेना व शहर विकास आघाडीकडे १७ सदस्यसंख्या असल्याने सर्व सहाही समित्यांची सभापतिपदे आपल्याकडे राखण्यात त्यांना यश आले. कमी सदस्यसंख्येमुळे भाजप व मित्रपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी अर्जही दाखल केले नाहीत. भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची पुरती कोंडी करण्याच्या डावपेचात आज तरी शिवसेना यशस्वी ठरली आहे.आज, शुक्रवारी झालेल्या या विषय समिती सभापती निवडणुकीत सेना-शहर विकास आघाडीच्या सदस्यांनीच दुपारी २ वाजेपर्यंत आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. मात्र, भाजप मित्रपक्षांकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. संख्याबळच ११ इतके कमी असल्याने सभापतिपद मिळविता येणार नाही हे स्पष्ट झाल्यानेच भाजपतर्फे अर्ज भरण्यात आले नाहीत. अर्ज भरण्याच्या २ वाजता या मुदतीपर्यंत केवळ सेना-आघाडीचेच अर्ज दाखल झाल्याने सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता व आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन व विकास, महिला व बाल कल्याण या समितींच्या सभापतिपदांची निवडणूक बिनविरोध झाली. (प्रतिनिधी)(विषय समिती निवडणूक वृत्त हॅलो पान ४ वर)कशी केली कोंडी.. जल्लोषराष्ट्रवादीचे चार नगरसेवक आपल्या बाजूला वळवून शिवसेनेने याआधीच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी भाजपवर कुरघोडी केली होती. त्याचवेळी विषय समित्यांवरही सेना-आघाडीच वर्चस्व राखणार असे चित्र होते. हे चित्र आज वास्तवात उतरले आहे. सर्व सभापती विजयी झाल्यानंतर सभागृहात सेना-आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ‘कशी केली कोंडी...’ असेच मनोमन म्हणत विजयाचा जल्लोष केला.थांबा अन् वाट पाहा : मयेकरसभागृहात भाजप व मित्रपक्षांच्या सदस्यांची संख्या ही ११ असल्यानेच आम्ही सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरले नाहीत, असे सांगताना सेनेकडून शहर विकासासाठी सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. मात्र, सभापतिपदांची निवडणूक ही काही अखेरची नाही. अजून बरेच काही बाकी आहे. थांबा अन् वाट पाहा, असे सांगत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आपल्याकडे अजूनही काही हुकुमाची पाने शिल्लक असल्याचे संकेतच दिले आहेत.अपात्रता सुनावणी महत्त्वाची ठरणारराष्ट्रवादीतील ४ नगरसेवकांनी फुटून निघत शहरविकास आघाडी तयार केली. त्यांच्याविरोधातील अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी येत्या ३१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत या स्वतंत्र गटाची मान्यता सिध्द होणार असे सेना-आघाडीवाले ठामपणे सांगत आहेत, तर हा गट बेकायदा ठरेल, असे भाजपला वाटते आहे. त्यामुळे या सुनावणीनंतर काय निकाल लागतो यावरच पालिकेवर सेना-आघाडीचे वर्चस्व राहणार की भाजपचे, हे ठरणार आहे.