शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

उमेदवार आयात करावा लागणे हे भाजपचे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:19 IST

रत्नागिरी : राष्टÑीय पक्ष म्हणविणाऱ्या भाजपकडे स्वत:च्या पक्षाचा उमेदवार नाही. त्यांना उमेद्वार आयात करावा लागतो हे त्यांचे दुर्दैव आहे. याआधी जे पदवीधरचे आमदार होते व आता ज्यांना भाजपने आयात करून उमेद्वारी दिली आहे, त्यांनी गेल्या सहा वर्षांत मतदारसंघात तोंडही दाखवले नाही. त्यामुळे येथील मतदारांनी शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केल्याने सेना ...

रत्नागिरी : राष्टÑीय पक्ष म्हणविणाऱ्या भाजपकडे स्वत:च्या पक्षाचा उमेदवार नाही. त्यांना उमेद्वार आयात करावा लागतो हे त्यांचे दुर्दैव आहे. याआधी जे पदवीधरचे आमदार होते व आता ज्यांना भाजपने आयात करून उमेद्वारी दिली आहे, त्यांनी गेल्या सहा वर्षांत मतदारसंघात तोंडही दाखवले नाही. त्यामुळे येथील मतदारांनी शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केल्याने सेना उमेद्वार संजय मोरे यांचा विजय निश्चित आहे, असा दावा राज्याचे बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यात घटक पक्ष भाजप व केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जाऊन रस्त्यावर उतरून ते सोडवून घेत आहोत. आम्ही सरकारमध्ये असलो तरी अजून सरकारजमा झालेलो नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा लढा सुरूच आहे. त्यामध्ये आम्हाला यशही येत आहे. पालघरच्या पोटनिवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केला गेला. अखेरच्या क्षणी २८९ बूथ बंद केले गेले; मात्र शिवसेना या सर्वांना पुरून उरली आहे. शिवसेनेचा तो नैतिक विजयच आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात २५ जून रोजी होणाºया निवडणुकीतही साम, दाम, दंड, भेद असे प्रकार होऊ शकतात, असेही शिंदे म्हणाले.जिंकण्यासाठी संगणक पार्सल?शिवसेनेच्या जोरदार प्रचारामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच डावखरेंना पदवीधरांचे मतदान व्हावे म्हणून संगणकाची पार्सल काही ठिकाणी पाठविली गेली आहेत. प्रलोभने दाखवली जात आहेत. गुप्त बैठका होत आहेत. त्यातून भाजपच्या हाती काहीच लागणार नाही. संबंधित संस्थांनी संगणकाची पार्सले परत घेऊन जाण्यास सांगितल्याचा दावा शिंदे यांनी केला.