भाजप रत्नागिरीत उभारणार ऑक्सिजन बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:20+5:302021-05-19T04:32:20+5:30

- जिल्हाधिकारी यांच्यासोबत ऑनलाइन बैठक लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतील कोविड स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी ...

BJP to set up Oxygen Bank in Ratnagiri | भाजप रत्नागिरीत उभारणार ऑक्सिजन बँक

भाजप रत्नागिरीत उभारणार ऑक्सिजन बँक

Next

- जिल्हाधिकारी यांच्यासोबत ऑनलाइन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतील कोविड स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी २५ बेडची सुसज्ज कोविड सेंटर उभारणार आहे, तसेच ऑक्सिजन बँक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी माहिती दिली.

आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, युवामोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी मिश्रा यांचेसह ऑनलाइन बैठक केली. त्या बैठकीमध्ये कोविड सेंटर उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला, तसेच प्रसाद लाड हे ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्ह्याला बुधवार दिनांक १९ मे, २०२१ रोजी देण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून ऑक्सिजन बँकेची उपयुक्त संकल्पना राबविण्यात येणार आहे. २ रुग्णवाहिका भाजपसाठी उपलब्ध करून देण्याचे रवींद्र चव्हाण व प्रसाद लाड यांनी सांगितले, तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी जिंदल कंपनीचे माध्यमातून भाजप एक अतिरिक्त ऑक्सिजन टॅंक सप्लाय करणार असून, त्यासही तांत्रिक मंजुरी द्यावी, अशी मागणी राणे यांनी केली. त्याला जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रसाद लाड आणखी एका हॉस्पिटलला त्यांच्या सीएसआरमधून २० व्हेंटिलेटर बेड, तसेच ऑक्सिजनसह १ ऑक्सिजन युनिट देत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. जिल्हाधिकारी यांनी या विषयास तत्काळ मंजुरी देऊ, असे या बैठकीत स्पष्ट केले.

कोविड परिस्थितीमध्ये कोणतेही राजकारण न करता, संपूर्ण सहकार्य भाजप करेल, असे रवींद्र चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले. ग्रामदक्षता समित्या अधिक सक्रिय करा, त्यांच्यासाठी काही आर्थिक तरतूद करा़, तसेच जिल्हा रुग्णालयामधील पावसाचे पाणी साचण्याचा प्रकार लवकर नियंत्रणात आणा, अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. नीलेश राणे यांनी आपल्या रुग्णालयाच्या संपर्कातून तज्ज्ञ डॉक्टर व काही प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, सर्व प्रयत्नांची गरज आहे, अशा पद्धतीने ‘ऑक्सिजन बँक’ ही नवीन संकल्पना येथे उत्तम पद्धतीने राबवू़, तसेच तज्ज्ञ डॉक्टर हे आवश्यक आहेत, ही उपलब्धता महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगितले, तसेच आपण मांडलेल्या सर्व प्रस्तावांना आपण तत्काळ मंजुरी देऊ, असे स्पष्ट आश्‍वासन दिले.

Web Title: BJP to set up Oxygen Bank in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.