सचिन मोहितेदेवरुख : श्वानाच्या शिकारीच्या नादात बिबट्या धावला अन् पिंजऱ्यात अडकल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे - जंगलवाडी येथे बुधवारी सकाळी घडली.देवळे जंगलवाडीलअशोक तुकाराम कांबळे यांचे घराशेजारी असलेल्या शौचालयात सकाळी ६ वाजणेच्या सुमारास बिबट्या श्वानाच्या मागून घुसला. दरवाजा बंद झाल्याने श्वान व बिबट्या आतमध्ये अडकले. त्यानंतर याची माहिती लगेचच वनविभागाला देण्यात आली. विभागाचे अधिकारी सकाळी ७.३०च्या सुमारास घटनास्थळी आले आणि बिबट्याला ८.१५ वाजता पिंजऱ्यात सुरक्षित घेतले. वनपाल सुरेश उपरे त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने ही मोहीम राबविली गेली.देवळे येथे पिंजऱ्यात पकडलेला बिबट्या मादी जातीचा असून, ४ वर्षांचा आहे. बिबट्या पकडल्याची माहिती गावात पसरताच अबालवृद्धांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. शिकारीसाठी गेलेल्या बिबट्याला अखेर श्वानाची शिकार करताच आली नाही. त्यामुळे त्या श्वानाला जीवदान मिळाले आहे. दरम्यान तालुक्यात बिबट्यांचा मनुष्यवस्तीतील वावर वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
श्वानाच्या शिकारीसाठी बिबट्या धावला अन् पिंजऱ्यात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 13:27 IST
श्वानाच्या शिकारीच्या नादात बिबट्या धावला अन् पिंजऱ्यात अडकल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे - जंगलवाडी येथे बुधवारी सकाळी घडली.
श्वानाच्या शिकारीसाठी बिबट्या धावला अन् पिंजऱ्यात अडकला
ठळक मुद्देश्वानाच्या शिकारीसाठी बिबट्या धावला अन् पिंजऱ्यात अडकला