शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात वाहतूक कोंडीने फुटला घाम, गणेशोत्सवासाठी चाकरमानी काेकणात दाखल

By संदीप बांद्रे | Updated: September 20, 2023 16:49 IST

चिपळूण : गणेशोत्सवासाठी यावर्षी काेकणात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर एसटीच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ...

चिपळूण : गणेशोत्सवासाठी यावर्षी काेकणात मोठ्या प्रमाणात मुंबईकर दाखल झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर एसटीच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. खासगी वाहनांचीही संख्या वाढली आली आहे. निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून यावर्षी मुंबईकरांना एसटीला ‘स्पॉन्सरशिप’ मिळाली आहे. त्यामुळे हजारो गाड्या महामार्गावर धावत आहेत. मात्र, त्यामुळे वाहतूककोंडीने अक्षरशः घाम फुटला आहे.महामार्गावरील वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे परशुराम घाट ते चिपळूण शहर परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. जिल्ह्यामध्ये एसटीच्या अडीच हजारहून अधिक गाड्या दाखल झाल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी त्यातील काही गाड्या आत्ताच चिपळूण आगारात थांबवून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील शिवाजीनगर बसस्थानक एसटीचा तळ बनले आहे. मात्र, ही जागा अपुरी पडत असल्याने चौपदरीकरण केलेल्या महामार्गावर ठिकठिकाणी एसटीच्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव काळात उड्डाणपुलाचे काम बंद ठेवावे, अशी मागणी केली जात होती, परंतु अद्याप हे काम सुरु आहे. त्यामुळे बहादूरशेख चौक येथे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. चिपळूण शहर बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जाणवत असून चाकरमान्यांच्या ज्यादा गाड्या बाजारपेठेतूनच सोडण्यात येत आहेत. चाकरमान्यांना सोडून येणाऱ्या रिकाम्या गाड्या गुहागर बायपास मार्गे न वळविता बाजारपेठेतून येत असल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

सीएनजीचा तुटवडाचिपळुणात सध्या सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे. शहरालगत वालोपे, बहादूरशेख चौक, शिवाजीनगर एसटी स्थानक या ठिकाणी एकूण तीन सीएनजी पंप आहेत. सावर्डेमध्येही एक पंप आहे. मात्र, सध्या सीएनजीचा पुरवठा कमी पडत असून, निदान गणेशोत्सवासाठी मध्यवर्ती असणाऱ्या चिपळूणमध्ये सीएनजीचा पुरवठा चोवीस तास हवा. सद्यस्थितीत सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीत अडकलेले चाकरमानी पुन्हा सीएनजीसाठी खोळंबत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी