शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भोस्तेत राडा; आठजण अटकेत

By admin | Updated: February 2, 2016 23:38 IST

गाडीला बोजू देण्यावरून दोघा दुचाकीस्वारांमध्ये वाद.

खेड : भोस्ते गावातील जलाल शेख मोहल्ला येथे दोन दुचाकीस्वारांमध्ये बाजू देण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. भोस्ते जलाल शेख मोहल्ला येथील मुब्बसीर ऊर्फ पप्पू हमजा माटवणकर (३१), शोएब इसा पोफळणकर (३०) व अकबर याकुब मांजरेकर (३२), तर शिवफाटा-खेड येथे राहणारे रोनीत अनिल इनरकर (२२), रोहन अनिल इनरकर (४५) या आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. शादाब पोफळणकर, मोबीन शेख व इतर वीस जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता रोनीत अनिल इनरकर हा आपल्या मित्रांसमवेत दुचाकीने रेल्वेस्टेशनकडे जात असताना शोएब पोफळणकर रेल्वे स्टेशनकडून दुचाकीने येत होते. त्यावेळी त्याच्या गाडीला बाजू देण्यावरुन बाचाबाची झाली. यातील रोनीत इनरकर याने आपल्या आई-वडिलांना ही हकीकत सांगितल्यानंतर ते घटनास्थळी आले. रोहन अनिल इनरकर व अनिल देवराम इनरकर (५८) अनिता अनिल इनरकर (४५) हे तिथे पोहोचले. त्यानंतर जमावाने इनरकर कुटुंबियांना हाताच्या ठोशाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली व शिवीगाळ केली. त्यानंतर इनरकर कुटुंबीय थेट खेड पोलीस स्थानकाकडे आपल्या दुचाकीने जात असतानाच अनिता इनरकर यांची दुचाकी अडवून त्यांना मोटरसायकलवरुन खाली पाडले. त्यांच्या अंगावरील पोषाख फाडला. तसेच असभ्य वर्तन केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद अनिता अनिल इनरकर यांनी खेड पोलिसांत दिली आहे. इनरकर कुटुंबियांच्या विरोधात रोहन इसान पोफळणकर जलाल शेख मोहल्ला याने खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार रोनीत अनिल इनरकर, बॉबी खेडेकर, अनिल इनरकर, अनिता इनरकर व अमोल यालाप्पा (सर्व रा. शिवफाटा) यांच्या विरोधात दुचाकी अडवून मारहाण केल्याची फिर्याद खेड पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक डी. एम. जाधव तपास करीत आहेत. ही घटना भोस्ते विराचीवाडी येथे सायंकाळी घडली. मंगळवारी सकाळी ८ वाजता ३ आरोपींना तर स. १२.३० वा. ५ जणांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)