शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भैरवच्या पालखी भेटीचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 22:08 IST

शहरातील राजीवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी पार पडला.

रत्नागिरी : शहरातील राजीवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी विश्वेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्री देव काशीविश्वेश्वर मंदिर व मांडवी येथील श्रीदेव भैरव मंदिरामध्ये नामसप्ताहाला प्रारंभ होतो, तर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी या सप्ताहाची समाप्ती होते.सप्ताहाच्या समाप्तीनंतर दोन्ही मंदिरांमध्ये पालख्यांमधून देवतांची मिरवणूक काढण्यात आली. मांडवी येथील श्री देव भैरव राजीवडा येथे काशीविश्वेश्वराच्या भेटीला येतो. काशीविश्वेश्वराच्या नामसप्ताहाची सांगता सोमवारी दुपारी १२.३० वाजता झाल्यानंतर पालखी मंदिराबाहेर येते व मंदिराच्या आवाराबाहेरील घाटीवरुन पाच प्रदक्षिणा घालते.  पालखीच्या तिसºया प्रदक्षिणावेळी श्री भैरीच्या पालखी भेटीचा हा सोहळा रंगला.मांडवीतील भैरव देवाची पालखी मंदिरातून बाहेर पडल्यावर भडंगनाका, ८० फुटी हायवे नाका, बंदररोड, मुरलीधर मंदिर, काँग्रेसभवन, विठ्ठल मंदिर, धमालणीचा पार, गोखले नाका,  मारुती आळीतील मंदिर, पुन्हा गोखले नाकामार्गे,  राधाकृष्ण नाका, रामआळी, तेलीआळीमार्गे खडपेवठार येथून विश्वेश्वर घाटीवरुन आली. या घाटीमध्येच दोन्ही पालख्यांचे विणेकरी, मानकरी यांच्या भेटी झाल्यावर पालखी भेटीचा सोहळा रंगला. यावेळी भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी टाळ-मृदुंगांचा आवाज, ढोल-ताशांचा गजर व भजनामध्ये भाविक दंग झाले होते. सोमवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पालखी भेटीचा हा सोहळा रंगला. पालखी भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्यांच्या मानकऱ्यांनी श्रीफळ देऊन देवाची भेट घडवून आणली. यावेळी भक्तांची गर्दी अधिक होती.पालखी मंदिरातगाऱ्हाणे झाल्यावर श्री भैरवाची पालखी खडपेवठार, चवंडेवठार, विलणकरवाडी, घुडेवठार, दत्तमंदिरमार्गे मांडवी येथील मंदिरात गेल्यानंतर नामसप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर दोन प्रदक्षिणा पूर्ण करत काशीविश्वेश्वराची पालखी मंदिरामध्ये विसावली.