बँक ग्राहकाला २५ हजाराचा आॅनलाईन गंडारत्नागिरीत गुन्हा दाखलरत्नागिरी : बँक आॅफ इंडियातून बोलतोय... तुमचे एटीएम कार्ड बंद पडले असून, ते चालू करण्यासाठी खाते क्रमांक सांगा, असे सांगून २५ हजार रुपये लंपास केल्याची घटना जोशी पाळंद परिसरात घडली. खात्यातून काढलेल्या रकमेचा वापर आॅनलाईन शॉपिंगसाठी करून फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत पोलिसांकडून अनेक वेळा जनजागृती होऊनसुध्दा नागरिक बळी पडत आहेत. अशीच घटना जोशी पाळंद परिसरात घडली. पंकजा प्रदीप शितूत (४५) या महिलेला २५ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला.पंकजा शितूत दुपारी १२.४० ते २च्या सुमारास घरात एकट्याच होत्या. त्यांना ८०८४९०५८२५ या नंबरवरून फोन आला. मी बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड बंद पडले असून, ते चालू करण्यासाठी तुमचा खाते क्रमांक द्या, असे सांगून फिर्र्यादीचा खाते क्रमांक मिळवला. त्यानंतर आॅनलाईन शॉपिंग केले व रिचार्ज करून सुमारे २५ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे शितूत यांनी शहर पोलीस ठाणे गाठून अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
बँक ग्राहकाला २५ हजाराचा आॅनलाईन गंडा
By admin | Updated: March 9, 2017 18:07 IST