रत्नागिरी : जादुटोणाविरोधी कायदा शासनाने २० डिसेंबर २0१३ रोजी संमत केला तरी हा कायदा ताकदीने राबवण्यासाठी त्याचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकांना तो कळावा, त्याचे प्रबोधन व्हावे, शिवाय त्यांना सहभागी करून घेण्यासाठी राज्यातील ३५ जिल्ह्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. पैकी रत्नागिरीतील ही सतरावी सभा असल्याचे प्रतिपादन जादुटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी सांगितले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने जादुटोणाविरोधी कायदा, जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीतर्फे खातू नाट्यमंदिर येथे प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.अखंड भारतात बुवाबाजीचे थैमान सुरु आहे. सर्वसामान्यच नव्हे; तर धनाढ्य, राजकारणीही त्याचे बळी ठरतात. २०० पेक्षा अधिक चमत्कार करणारे बाबादेखील आहेत. परंतु प्रत्यक्षात चमत्कार वगैरे काही नसतो, हातचलाखी असते. यावेळी प्रात्यक्षिक म्हणून हातातून सोन्याची चेन व अंगठी काढून दाखवली. यावेळी प्रा. मानव यांनी जादुटोणाविरोधी कायद्यातील कलमांचीही माहिती दिली. जादूटोणा ाकायदा ताकदीने राबवण्याची गरज आहे. तरच समाजातील अंधश्रध्दा मिटतील, तसेच याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही मानव म्हणाले.(प्रतिनिधी)
जादुटोणा कायद्याविषयी प्रबोधन होणे गरजेचे
By admin | Updated: December 4, 2014 23:39 IST