शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

अरुणाचा जीवनप्रवास उलगडला

By admin | Updated: June 22, 2015 00:24 IST

वैशाली गावडे : कुडाळात बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे आदरांजली

कुडाळ : येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्यावतीने केईएम रुग्णालयामधील डॉग सर्जरी शाखेच्या प्रमुख अरुणा शानबाग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला केईएम रुग्णालयाच्या माजी अधिपरिचारिका आणि अरुणा शानबाग यांच्या सहपरिचारिका तसेच बॅ. नाथ पै स्कूल आॅफ नर्सिंगच्या प्राचार्या वैशाली गावडे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी त्यांनी १९६६ ते २०१५ पर्यंतचा अरुणा शानबाग यांचा वेदनामय जीवनप्रवास उलगडला. प्राचार्या गावडे म्हणाल्या, कार्यतत्पर, शिस्तप्रिय, निर्भीड आणि उमदे व्यक्तिमत्व असणारे आयुष्य एका काळ्या संध्याकाळी दु:खाच्या दरीत कोसळले. २७ नोव्हेंबर १९७३ ची संध्याकाळ माणुसकीला काळीमा फासणारी ठरली. केईएम हॉस्पिटलमधील डॉग सर्जरी शाखेच्या प्रमुख अरुणा शानबाग यांच्यासोबत रुग्णालयात कार्यरत असलेला सोहनलाल वाल्मिकी या कक्षसेवकाने त्यांच्यावर बलात्कार करून कुत्र्याला बांधण्यात येणाऱ्या साखळीने गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शानबाग यांचा तेथेच कार्यरत असलेल्या एका डॉक्टरसोबत विवाह निश्चित झाला होता. परत्ांु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. म्हणूनच विवाहाच्या आधीच पंधरा दिवस तो जीवन संपवून टाकणारा प्रयत्न घडल्याचे त्यांनी सांगितले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी गेली ४२ वर्षे अनेक अडचणींना सामोरे जात अरुणा शानबाग यांची शुश्रृषा करणाऱ्या केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी प्राचार्य नागराज सुनागर, शिवगौडा पाटील, विद्यानंद भंगावती, रुझाई गामा, किरण सावगावे, अपर्णा सनदी, शांती मेरयी, ममता कासले, शांभवी आजगावकर, प्रणाली मयेकर व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रिया डिचोलकर यांनी मानले. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)