शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

सेनेचे आता कायमच स्वबळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 01:24 IST

रत्नागिरी नगरपरिषद : सेना - भाजपमधील मतभेद विकोपास

रत्नागिरी : नगरपरिषदेच्या प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने यश संपादन करून येत्या नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा घंटानाद केला आहे. नगरपरिषदेतील सेना-भाजपमधील मतभेदांची दरी वाढली असून, येत्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी सेनेने स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी नगरपरिषदेची चार वर्षांपूर्वी झालेली सार्वत्रिक निवडणूक सेना-भाजप यांनी युती करून लढवली होती. त्यावेळी रत्नागिरीकरांनी युतीला भरभरून मतदान केले होते. तब्बल २१ जागांवर युतीला विजय संपादन करता आला होता. त्यावेळी राज्यभरातही युती जोरात होती. सेना व भाजप या दोन्ही पक्षांनी आपसात सव्वा-सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपद वाटून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मिलिंद कीर यांना पहिल्या सव्वा वर्षासाठी नगराध्यक्षपद मिळाले. दुसऱ्या सव्वा वर्षाच्या काळासाठी भाजपचे अशोक मयेकर यांनी नगराध्यक्षपद भुषविले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत युती तुटली व त्याचा परिणाम रत्नागिरी नगरपरिषदेतही झाला. सेनेला दुसऱ्या टप्प्यातील नगराध्यक्षपद न दिल्याने सेना व भाजपमध्ये त्यानंतर सातत्याने वाद सुरू आहेत. २ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या चार जागांच्या पोटनिवडणुकीतही सेना-भाजपची युती झाली नाही. त्यानंतर १० जानेवारी २०१६ ला झालेल्या एका जागेच्या पोटनिवडणुकीतही सेनेने भाजपकडे पाठिंबा मागितला असता ती जागाच भाजपने मागितली. मात्र सेनेने त्यास नकार दिला. भाजपनेही सेनेच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उभा केला. एकूणच भाजप व सेना या दोन्ही पक्षांतील रत्नागिरी नगरपरिषदेमधील मतभेद विकोपाला गेल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)युती नकोच : नोव्हेंबरच्या निवडणुकीत सत्तास्थापनेची तयारी...रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेतील सर्वांनीच एकत्र येऊन सेना उमेदवाराला विजयी केले आहे. नगरपरिषदेत सेनेचे वर्चस्व निर्माण केले आहे. एकट्याच्या बळावरही अधिक मतांचा फरक मिळवून दाखविणाऱ्या सेनेने येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यातील सार्वत्रिक निवडणुकीतही ‘एकला चलो’रे ची तयारी सुरू केली आहे. भाजपशी युती नकोच असे शिवसैनिकांचे मत असून जे प्रभाग २ अ मधील पोटनिवडणुकीत घडले तेच नोव्हेंबरच्या पोटनिवडणुकीतही रत्नागिरीकरांच्या सहकार्याने घडेल, असा शिवसैनिकांना विश्वास वाटत असून, राष्ट्रवादी व भाजप सेनेच्या या आव्हानाला कसे तोंड देणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे.