शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नदुर्ग किल्ल्यावर उद्या साजरा होणार आरमार विजय दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:20 IST

शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग  मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी

ठळक मुद्देअठरा पगड समाजबांधवांचे शोभायात्रेसह आगमनभागेश्वरी मंदिर ते भगवती मंदिर अशी शोभायात्रा अठरा पगड जातींच्या समाजबांधवांकडून काढली जाणार आहे.

रत्नागिरी : शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग  मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी समाज आणि अठरा पगड समाजांच्यावतीने रविवार, २५ रोजी शहरातील भगवती मंदिर येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर ‘आरमार विजय दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शोभायात्रा तसेच इतिहास संशोधक यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. अजिंक्य समजल्या जाणाºया इंग्रजांना १८ सप्टेंबर १६७८ रोजी समुद्री हल्ल्यात पराभूत करण्याचा असामान्य पराक्रम रत्नागिरीचे सुपुत्र दर्यासारंग  मायनाक भंडारी, दौलतखान आणि अठरा पगड जातींच्या त्यांच्या शिलेदारांनी केला.  त्यामुळे बहुजन समाजाचा हा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी १८ सप्टेंबर हा दिवस आरमार विजय दिन म्हणून गेल्या काही वर्षांपासून तालुका भंडारी समाज तसेच बहुजन समाजातर्फे साजरा करण्यात येत आहे. 

दिनांक २५ नोव्हेंबर रोजी शहरातील भगवती मंदिर येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर हा आरमार विजय दिन साजरा करण्यात येणार आहे. तालुका भंडारी समाजाबरोबरच कुणबी समाजोन्नती संघ, तेली सेवा संघ, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशन, खारवी समाज विकास समिती, त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ, लिंगायत सेवा संघ, नामदेव शिंपी समाज मंडळ, परिट समाज सेवा संघ, भोई समाज, धनगर समाज संघ, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ, कोळी समाज, सुतार समाज संघ, गाबित समाज, कुंभार समाज, आगरी समाज आदींच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी ३.३० वाजता भागेश्वरी मंदिर ते भगवती मंदिर अशी शोभायात्रा अठरा पगड जातींच्या समाजबांधवांकडून काढली जाणार आहे. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या वेषभूषा केलेल्या समाजबांधव यात सहभागी होणार आहेत. यावेळी रत्नदुर्ग किल्ला येथे भागोजीशेठ कीर यांच्या नावाच्या पाटीचे अनावरण होणार आहे. त्यानंतर याठिकाणी इतिहास संशोधक तसेच विविध समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFortगड