राजीव मुळ्ये -सातारा -झाडे तोडण्यास परवानगी नसल्याने वृक्ष ‘धोकादायक’ असल्याची आवई उठवायची आणि लाकूडफाटा पदरात पाडून घ्यायचा, असा गोरखधंदा जिल्ह्यात विविध ठिकाणी जोमाने सुरू आहे. वृक्ष धोकादायक असल्याचे भासविण्यासाठी झाडांची खोडे आतून जाळून ती पोखरली जात आहेत. झाड धुमसून पेटविण्याचा प्रयत्न करताना पूर्ण खोडालाच आग लागल्यामुळे या विघ्नसंतोषीपणाचा सज्जड पुरावा ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.नियमानुसार झाडे तोडण्यास बंदी असून, धोकादायक बनलेली झाडेच तोडता येतात. या प्रवृत्तींविरुद्ध वृक्षप्रेमींनी जोरदार आक्षेप नोंदविला असून, कोणतीही कारवाई न करणाऱ्या प्रशासनाच्या हेतूंबद्दल संशय व्यक्त केला आहे. पांढरे आणि चॉकलेटी पट्टे मारलेली झाडे ‘सरकारी’ असतात. ती पडली किंवा तोडली गेली, तरी त्याच्या संपूर्ण नोंदी शासनदरबारी असणे आवश्यक आहे. तथापि, झाड पडण्याचे किंवा तकलादू होण्याचे हे ‘मानवनिर्मित’ कारण नजरेआड करण्यात येत असल्याचा वृक्षप्रेमींचा आरोप आहे. सातारा-कोंडवे रस्त्यावर बुधवारी रात्री झाड ‘धोकादायक’ ठरविण्याचा असाच एक प्रयत्न सुरू होता. तथापि, खोड धुमसत राहण्याऐवजी पूर्णच पेटले आणि झाडे मुद्दाम पेटविली जात आहेत, या दाव्याला बळकटी मिळाली. पेटलेले झाड विझविण्यासाठी कधीही प्रयत्न केला जात नाही. बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर शेकडो महाकाय वृक्ष होते. त्यातील अनेक वृक्ष अशा प्रकारेच कमी झाले आहेत. पाटण तालुक्यापासून जावळी तालुक्यापर्यंत अनेक ठिकाणी असे प्रयत्न झाले आहेत. तथापि, ते प्रशासनाकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याबद्दल वृक्षप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. वृक्ष ‘धोकादायक’ कसा बनवतात?झाडाच्या खोडात खालच्या बाजूला कुऱ्हाडीने थोडी खोलगट जागा करून घेतली जाते व ती आतपर्यंत पोखरली जाते कोळसा आणि कापडाचे बोळे रॉकेलमध्ये बुडवून ते या जागेतून खोडात आतपर्यंत कोंबले जातातबाहेरून जाळ लावल्यानंतर झाड आतून धुमसत राहते; परंतु आग बाहेर दिसत नाहीकालांतराने आतून जळालेली एखादी मोठी फांदी मोडून पडते आणि ‘झाड धोकादायक आहे,’ अशी आवई उठविली जातेप्रशासनाने काय करायला हवे?धोकादायक बनलेल्या वृक्षाची पंचांसमक्ष पाहणीमानवी हस्तक्षेप असल्यास अशा वृक्षांच्या लिलावाला बंदीसंबंधित भागातील तलाठ्यांकडून वृक्षांच्या बारकाईने नोंदीपर्यावरण क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थांच्या प्रतिनिधींसमक्ष अशा घटनांचा सोक्षमोक्ष
झाडे ‘धोकादायक’ बनतात? नव्हे बनवितात!
By admin | Updated: May 22, 2015 00:20 IST