शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळ ते चिपळूण जलमार्गाला मंजुरी, कामे लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन

By संदीप बांद्रे | Updated: August 1, 2023 21:35 IST

दिल्ली येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची आमदार शेखर निकम यांनी घेतली भेट

संदीप बांद्रे / चिपळूण : दाभोळ ते पेढे जलमार्ग, चिपळूण शहर पूर नियंत्रण प्रकल्प तसेच पर्यटन संदर्भात दिल्ली येथे केंद्रीय बंदर नौकानयन, जल वाहतूक आणि पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांची आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आणि कपूर उपस्थित होते. दाभोळ ते पेढे (गोवळकोट) या राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक २८ आणि पेढे येथील नियोजित 'रोरो आयडब्ल्यूटी टर्मिनल'ला मंजुरी देऊन हे काम मार्गी लावल्याबद्दल आमदार निकम यांनी मंत्री श्रीपाद नाईक यांचे या भेटीत आभार मानले. या जलमार्गाच्या विकासामुळे मालवाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूक आणि पर्यटन व्यवसायाला ही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या जलमार्गाच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आमदार शेखर निकम यांचे गेले दोन वर्ष श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. या प्रकल्पामुळे चिपळूण शहराच्या पूर नियंत्रणाला ही फायदा होणार आहे.

चिपळूण शहर पूर नियंत्रणाबाबत केंद्राकडे पाठवायच्या प्रस्ताबाबत आमदार निकम यांनी श्रीपाद नाईक यांच्याशी चर्चा केली. यासाठी संपूर्ण वाशिष्टी नदीच्या उगमापासून संगमापर्यंत सखोल सर्व्हे आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, त्याचीही माहिती यावेळी नाईक यांना दिली. चिपळूण शहर पूर  नियंत्रणासाठी आमदार निकम यांचा केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि बंदर नौकानयन, जलवाहतूक मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या दोन महत्त्वाच्या कामांव्यतिरिक्त आपल्या मतदारसंघातील ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पर्यटन विकासाच्या कामाबाबतही केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामांबाबतही आमदार निकम यांनी यावेळी नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या तिन्ही कामाबाबत नाईक हे खूपच सकारात्मक असल्याचे यावेळी समोर आले आहे. याबाबत आमदार शेखर निकम यांच्यासह उपस्थितांनी केंद्रीय मंत्री नाईक यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Chiplunचिपळुण