शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरीत आपत्ती व्यवस्थापन समन्वयासाठी पाच नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

By शोभना कांबळे | Updated: July 20, 2023 19:19 IST

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली माहिती

रत्नागिरी : पूर परिस्थितीमुळे खेडमधील बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विषयक कामांचे सनियंत्रण व सर्व संबधित विभागांशी समन्वय साधण्यासाठी पाच नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गुरूवारी दिली.मुसळधार पावसामुळे खेड-दापोली, भोस्ते-अलसुरे, चिंचघर ते बहिरवली जाणारा रस्ता हे मार्ग संपर्क तुटलेले होते. परंतु, ते आता पूर्ववत झालेले आहेत. त्याशिवाय तळवट खेड- तळवट जावळी, खेड-शिर्शी (देवणा पूल), शिव मोहल्ला ते शिव खुर्द (बौध्दवाडी क्र.१) हे रस्ते पूर्ववत सुरु झाले असून आंबवली बाऊलवाडी रस्त्यावर दरड हटवण्याचे काम सुरु असून तेही पूर्ववत होईल.शिरगाव (बागवाडी), शिरगाव (पिंपळवाडी), शिरगाव (फोंडवाडी), शिरगाव (धनगरवाडी), अलसुरे मोहल्ला या संपर्क तुटलेल्या गावात व वाडयांमध्ये दळणवळण सुरु झाले आहे.खेडमधील १०३ कुटुंबातील ३८० जणांना स्थलांतरीत केले आहे. दरडप्रवण पोसरे खुर्द (बौध्दवाडी), पोसरे (सडेवाडी), साखर (बामणवाडी), मुसाड, बिरमणी गावातील एकूण १४ कुटुंबातील ४७ जणांना स्थलांतरीत केले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची व दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.आपत्ती व्यवस्थापन विषयक कामांचे सनियंत्रण व सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधण्यासाठी खेडसाठी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, राजापूरसाठी उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) एम.बी. बोरकर, चिपळूणसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक यांची, संगमेश्वरसाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर यांची तर दापोलीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfloodपूर