शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, हेगशेट्ये यांनी सांगितल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:27 IST

अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देलागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, हेगशेट्ये यांनी सांगितल्या आठवणीलग्नाची बेडी नाटकाच्या प्रयोगासाठी एकही रूपया घेतला नाही

शोभना कांबळेरत्नागिरी : सामाजिक कृतज्ञता निधी संकलनाचे काम महाराष्टभर सुरू होते. या निधीला हातभार लावण्यासाठी डॉ. श्रीराम लागू यांनी पुढाकार घेऊन लग्नाची बेडी या नाटकाचे प्रयोग मानधनाचा एकही पैसा न घेता महाराष्ट्रात केले आणि त्यातून निधी गोळा केला. या नाटकाच्या निमित्ताने डॉ. लागू रत्नागिरीत आणि चिपळुणात आले होते.

अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली.डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या रत्नागिरीतील वास्तव्याच्या आठवणी हेगशेट्ये यांनी जाग्या केल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अभिजीत हेगशेट्ये यांच्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती.

सामाजिक संस्थेत काम करताना पैशांची अपेक्षा कधीच केली नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांसाठी निधी उभारण्यासाठी डॉ. दाभोलकर आणि डॉ. लागू यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम १९९६-९७च्या सुमारास सुरू झाला होता.

सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, मालवण यानंतर रत्नागिरी, चिपळूण याठिकाणी लग्नाची बेडी हे नाटक झाले. त्यावेळी डॉ. लागू यांच्यासह निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रोहिणी हट्टंगडी, रिमा लागू, भारती आचरेकर आदी मातब्बर कलाकार रत्नागिरीत आले होते.डॉ. लागू यांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल हेगशेट्ये म्हणाले की, डॉ. लागू हे मोठे व्यक्तिमत्व होते. मात्र, ते सामान्यांसारखेच राहिले. प्रत्यक्षात ते नटसम्राट होते. कित्येक दशके त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. रंगमंचावरील डॉ. लागू आणि प्रत्यक्षातील डॉ. लागू हे वेगळेच असायचे. ते पक्के तत्वनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ होते.

सामाजिक जाणीव असल्याने सामाजिक बांधिलकी मानणारे होते. म्हणूनच लग्नाची बेडी या नाटकाचे सलग प्रयोग करताना नाटकाच्या टीममधील एकाही अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने मानधनाचा एकही पैसा घेतला नाही. हे केवळ डॉ. लागूंमुळे झाले. कारण नाट्यक्षेत्रात त्यांचे दादा व्यक्तिमत्व होते.तिकीट विक्रीतून १ लाख ६० हजार जमारत्नागिरीतील निधी संकलनासाठी जे. के. फाईल्सचे तत्कालिन सरव्यवस्थापक सर्वोत्तम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत आप्पा बेर्डे, भाई बेर्डे ही मंडळी होती. या सर्वांच्या सहकार्याने लग्नाची बेडी नाटकाच्या तिकीट विक्रीतून त्याकाळी तब्बल १ लाख ६० हजार रूपयांचा सामाजिक कृतज्ञता निधी रत्नागिरीतून गोळा करण्यात आला होता. डॉ. लागू यांनी कोणतेही मानधन न घेता या नाटकाचे प्रयोग केले होते. 

टॅग्स :Shriram Lagooश्रीराम लागूRatnagiriरत्नागिरी