शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...अन् संदेश झाला शेतकरी, कोरोनामुळे परतला गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 17:33 IST

agriculture Ratnagiri-रत्नागिरी तालुक्यातील चांदोर-साठरे गुंजाळ गावातील संदेश रसाळ हा तरुण बारावीनंतर आयटीआय करून, मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीवर रुजू झाला. नोकरीला लागून जेमतेम वर्षच झाले होते. कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाले व नोकरी गेली. गावाकडे परतल्यानंतर सहा महिने काय करावे, हाच विचार सुरू होता. अखेर शेती करण्याचा निर्णय संदेशने घेतला. सहा महिने त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ प्राप्त होऊ लागल्याने भविष्यात शेतीच करायचा निर्णय त्याने घेतला आहे.

ठळक मुद्दे...अन् संदेश झाला शेतकरी, कोरोनामुळे परतला गावीसहा महिने काय करावे?, कठोर परिश्रमाचे फळ प्राप्त

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : तालुक्यातील चांदोर-साठरे गुंजाळ गावातील संदेश रसाळ हा तरुण बारावीनंतर आयटीआय करून, मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीवर रुजू झाला. नोकरीला लागून जेमतेम वर्षच झाले होते. कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाले व नोकरी गेली. गावाकडे परतल्यानंतर सहा महिने काय करावे, हाच विचार सुरू होता. अखेर शेती करण्याचा निर्णय संदेशने घेतला. सहा महिने त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ प्राप्त होऊ लागल्याने भविष्यात शेतीच करायचा निर्णय त्याने घेतला आहे.संदेशने आपला मित्र योगेश याला ही कल्पना सांगतातच, योगेशच्या वडिलांनी प्रोत्साहन दिले. योगेश व धाकटा भाऊ सुयोग यांच्या मदतीने गावातील पडीक जमीन मक्तेदारी पद्धतीने घेऊन त्यामध्ये कलिंगड, भेंडी, वाली, वांगी, मका, मटार, हिरवी मिरची, काकडी लागवड केली असून, उत्पादन सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजन केले. भाड्याने ट्रॅक्क्टर घेऊन नांगरणी केली. वाफे तयार करून प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र भाग केले आहेत. लागवडीसाठी नर्सरीतून चांगल्या प्रकारची रोपे विकत आणली.खत व्यवस्थापन, योग्य नियोजन, यामुळे पिकेही तरारली व उत्पादन सुरू झाले. विक्रीवरही स्वत:च लक्ष केंद्रीत केले आहे. शेतीमध्ये पैसा वाचवायचा असेल, तर अंगमेहनत प्रचंड आहे. चिकाटी व प्रयत्नाची जोड असेल, तर यश नक्कीच प्राप्त होते, म्हणून संदेशने आता नोकरीच्या मागे न लागता भविष्यात शेतीच करण्याचा निर्णय घेतला असून पावसाळ्यात कारली, भेंडी उत्पादन घेण्याचा मानस आहे.कलिंगड पीक धोक्यातउष्म्यामुळे कलिंगडाचा खप चांगला होतो. त्यामुळे संदेशने कलिंगडाचे दोन स्वतंत्र प्लॉट तयार करून लागवड केली. एका प्लॉटमध्ये चांगले उत्पन्न मिळाले. मात्र, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दुसऱ्या प्लॉटवर वेलमर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कलिंगडांची वाढ खुंटली आहे. यामुळे निराश न होता, नव्या उमेदीने संदेश मेहनत घेत आहे. घरची सहा गुंठे जमीन, स्वत: शेतातही कधी न गेलेल्या संदेशने आता शेतीच करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी